पान:छन्दोरचना.djvu/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दरचना <ピ ( १५) विशेष्यांच्या सड्गती विशेषणांसहि विभक्तिप्रत्यय लावण्याची संस्कृतांतील पद्धत मराठींत योग्य नाही. 'पवित्रे चरित्रे' 'पावनें झुपवनें? 'मङ्गलें जङ्गलें' हे प्रयोग अमराठी वाटतात. (१६) शुद्ध संस्कृत शब्द स्थिरोचार असल्यास त्यांची विकृति करू नये. सामान्यरूप करितांना झुपान्त्य स्वर दीर्घ असल्यास तो -हस्व होतो हा मराठी शब्दांच्या विषयींचा नियम संस्कृत शब्दांना लाबू नये. प्रितीला, रुपानें हीं रूपें चाङ्गलीं दिसत नाहींत. *शरिराला' हें रूप ओकवेळ चालेल; पण 'शरिरभोग' तर अगदी असह्य होती. (१७) नदी, वधू यांसारखे जे दीर्घ स्वरान्त शब्द आहेत त्यांतील अन्त्य स्वर कधीच -हस्व करूं नये. (१८) प्रीति, हेतु यासारख्या अिकारान्त आणि झुकारान्त नामांतील अन्त्यस्वर छन्दोवशातू दीर्घ लिहावेत; प्रीत, हेत अित्यादि काही थोडक्या शब्दांत यमकासाठी अन्त्य अकार होॠ द्यावा. समासांत मात्र हे शब्द शुद्ध रूपांतच योजावेत. दृष्टीशर, प्रीतीयुक्त, रघूनायक अशों समस्तरूपें त्याज्य होत. (१९) हृत् या नामाचें हृदीं हें सप्तमीचें रूप चालू ठेवावें पण समासांत हृदकमल न म्हणतां हृत्कमलच म्हणावें. ( २०) शशिन्, हस्तिन् सारखीं जीं नामें आहेत। त्यांचीं प्रथमेचीं रूपें शशी, हस्ती अशीं असतात. या रूपांतील अन्त्य अीकार -हस्व केला तरी चालेल; पण झुलटपक्षीं समासांत शशी-वदना, हस्तीदन्त अशीं रूपें त्याज्य गणावीत. (२१) छन्दस्, तपस्, तेजस्, नभस्, यासारखी जी नामें आहेत त्यांतील अन्त्य सूचा साहजिकच विसर पडते. शिक्षणाच्या प्रसारामुळे छन्दीमञ्जरी, तपोबल, तेजोभङ्ग, मनोरञ्जन अित्यादि समास जरी सर्वसामान्य परिचयाचे झाले आहेत तरी नवीन समास करितांना मन-रङ्वनासारखे करण्यांत आले तर ते क्षम्य मानावेत. (२२) मराठी समासांत सन्धि वैकल्पिक असला तरी शुद्ध संस्कृत समासांत तरी या विकल्पाला वाव नसावा. 'प्रभातश्रुदय,' 'जन-अिच्छा,' 'झुत्कण्ठाअनळ' अशों समस्तरूपें वापरुं नयेत,