पान:छन्दोरचना.djvu/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना <ース प्राचीन वा ग्रामीण रूपें वापरण्याची मोकळीक कवीला असली, तरी आपल्या भाषेत दूरान्वय आणि दुर्बोधता हीं येत नाहीत याविषयी कवीला दक्षता बाळगावीच लागते. ज्या कालांत कवि रचना करितो त्या काळच्या लोकांना तो आपलीच प्रचलित भाषा लिहीत आहे हें पटलें पाहिजे. नाहीतर त्यांना त्या काव्याविषयी आपुलीक वाटणार नाही. कवीला ओकन्दर ज्या शब्दसङ्ग्रहाची आवश्यकता भासते त्यांत अव्ययसर्वनामादि पदोपदीं येणारे काही शब्द असतात, आणि मराठी पद्यांत त्यांचीं अनेक रूपें प्रचलित आहेत. तेव्हा या बहुरूपी चिल्हर शब्दांचा झुपयोग केल्यास आणि समानार्थी शब्दांचा साठा ठेविल्यास, ‘अपि मार्ष मष कुर्यात् छन्दोभङ्गं न कारयेत्।” असें जरी वचन आहे तरी सामान्यतः शब्दांची विकृति करण्याचा प्रसड्ग कवीवर ओढवणार नाही. (१) संस्कृत धातूपासून, भूतकालवाचक धातुसाधित अव्ययापासून, आणि नामापासून, तसेच मराठी नामापासून नि विशेपणापासून क्रियापदें सिद्ध करण्याने अर्थ थोडक्या शब्दांत साङ्गतां येतो. अशा रीतीनें सिद्ध केलेलीं कवींनी घालून दिलेलें हें वळण पद्यांतच नव्हे तर निभडपणें गद्यांतहि गिरविलें पाहिजे. यांत भाषेचें हितच आहे. (२) करीं, करिशी, करी, करिती यासारख्या रूपांचा झुपयोग अनेक काळ दाखवायला होतो. यांचा त्याग करूं नये. अीकारान्त रूप सकर्मक क्रियापदासाठी योजण्याकडे लक्ष्य द्यावें. (३) न हें अव्यय वाक्यांत कोठेहि घालून क्रियापदाचें नकारार्थी रूप (४) काही क्रियाप्रदांच्या भूतकालाच्या रूपांत झुडला, झुडाला असे दोन्ही प्रकार आहेत. दोन्हीहि पद्यांत रूढ असले तरी होतां होअील तों जें रूप गद्यांत रूढ आहे तें वापरण्याकडे प्रवृत्ति असावी. झुबाला, जुळाला, झिजाला, तसेंच निघला, निमला, मिळला हीं रूपें बहुशः कोणी गद्यांत वापरीत नाही आणि पद्यांतहि वापरू नये. (५) करिती, करिशी यांच्या ठिकाणीं करिति, करिशि हीं रूपें केव्हा केव्हा