Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

....पण नाणं फेकणाऱ्या बाईची
मानसिकता कळणार नाही नाण्यावरून

खच्चून भरलेल्या एसटी बसबरोबर
माझं शरीर प्रवास करतंय
मनाच्या दोन्ही बाजू
नाण्याबरोबर खोल रुतत जातात
या शतकाच्या श्रध्दा अश्रध्देच्या गाळात

१६ / कबुतरखाना