पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जगापलीकडील चिरंतन परतत्त्वाचे अस्तित्व त्याला जाणवलेले असते.
 निरनिराळ्या उपनिषदांत हेच तत्त्व सांगितलेले आहे. फक्त शब्द वेगळे वेगळेआहेत. छांदोग्य उपनिषदातील प्रजापतीची कहाणी हीच कथा सांगते. याज्ञवल्क्य ऋषीने जनकाच्या पृच्छेला दिलेले उत्तरही असेच होते. जनकाने विचारले, “किम्ज्योतिः अयं पुरुषः?” हा पुरुष कोणाकडून प्रकाशित होतो? यावर याज्ञवल्क्याचेउत्तर असे - “स्वयंज्योतिः।” तो तर स्वयंप्रकाशित आहे. त्याला चंद्र,सूर्य, अग्नीयांच्या प्रकाशाची जरुरीच काय? हा प्राप्त करून घ्यावा. कारण प्रियतम अशीवस्तू 'आत्मा' हीच आहे. आपली पत्नी मैत्रेयी हिला याज्ञवल्क्याने सांगितले की"पती प्रिय असतो तो त्याच्यासाठी नव्हे तर स्वत:साठी, पुत्र प्रिय असतो तो पुत्रासाठी नव्हे स्वत:साठी, संपत्ती प्रिय असते ती स्वतःसाठी."(बृ. २.४) एकूणच प्रत्येकाला मग तो पती असो, पत्नी असो, पुत्र असो वा कन्या - ही नाती, हे प्रेम'मी'साठी असते. येथे 'मी' म्हणजे आपला आत्मा-त्याच्यासाठीच सर्व गोष्टी प्रियअसतात. “न वा अरे सर्वस्व कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियंभवति" म्हणून आत्म्याला पाहावे, त्याचे मनन करावे व त्याचा निदिध्यास करावा."आत्मानं विज्ञानेन इदं.... सर्वं विदितं । " ब्रह्म - आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजेसर्व ज्ञान होते. हे ज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे. हा आत्मासुद्धा ब्रह्म आहे. "सर्वं खलु इदं ब्रह्म ।” “अयमात्मा ब्रह्मं ।" ब्रह्म ही कल्पना उपनिषदांचे वैभव आहे असेविद्वान मानतात.

 ब्रह्म ही कल्पनासुद्धा हळूहळू बदलत आलेली आहे असे दिसते. ऋग्वेदकाली त्याचा अर्थ मंत्राच्या ठिकाणी असलेले अद्भुत सामर्थ्य, प्रार्थना, गूढशक्ती असेमानले जात असे. याचाच पुढे विकास झालेला दिसतो. ब्रह्म म्हणजे विश्वाचेआद्यकारण, परतत्त्व, क्षर, विश्वाच्या विविधतेच्या उगमस्थानी असणारे अक्षर तत्त्वअसा केलेला दिसतो. हे दृश्य जग ब्रह्मातून निर्माण झाले आहे आणि त्यातच लीन होणार आहे, त्याच्याच आधारे वर्तमान आहे, हे नीट समजावून घेऊन त्याची उपासना करावी. “सर्वं खलु इदं ब्रह्म तज्जलान्, इतिशान्त उपासीत.”उपनिषदांचाअसा दृढ विश्वास आहे की असे एकच एक वस्तुतत्त्व आहे की जे जाणून घेतले की'सर्व जाणले'. हा विश्वास दृढ होण्याचे कारण म्हणजे त्या तत्त्वाचे आणि आत्म्याचे

६०