पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घटनांची काहीही कारणपरंपरा सांगता येत नाही. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने चमस्कार. मनाचे तीन स्तर म्हणजे त्याचे बाह्यांग, अंतर्मन व खरा गाभा म्हणजेच एका अर्थाने आत्मा असे म्हणता येईल. अनेक अशक्य वाटणाऱ्या रुग्णांच्या, त्यातून ते संपूर्ण बरे झाल्याच्या कथा आपण वाचतो. पण सांख्यिक अभ्यास ह्या अपवाद म्हणून सिद्ध करू शकतो. वैद्यकशास्त्र त्यांना प्रबल जीवनाशा, प्रबल इच्छाशक्ती यामुळे हे होते असे सांगते. पण ही प्रबल इच्छाशक्ती फारच थोड्या लोकांत आढळते? ही इच्छाशक्ती मिळवणे कोणाही व्यक्तीला सहजपणे शक्य आहे का ? व्यावहारिक दृष्ट्या हे अशक्य आहे. शास्त्रही असेच गृहीत धरते. पण अध्यात्माद्वारा हे सहज शक्य आहे असे दिसते. पण त्यासाठी सात्त्विक जीवन व हे तत्त्वज्ञानाचे हार्द समजावून घेऊन ते आचरणात आणणे जरुरीचे आहे. यासाठी दीर्घ अभ्यास व आचरण, म्हणजेच तपश्चर्येची जरुरी असते. आजच्या युगात प्रत्येकाला पैसे टाकून हे मिळवावे असे वाटते किंवा ते कमीत कमी वेळात मिळाले पाहिजे अशी इच्छा असते. हे दोन्ही मार्ग याबाबत निरुपयोगी आहेत. रोजचे व्यावहारिक जीवन जगूनही आपण अंतर्मनाची शक्ती जागृत करू शकतो हे सत्य आहे, असेच संतांनी लिहून ठेवले आहे. फक्त त्याची आंतरिक ओढ पाहिजे. नमुने म्हणून आपण काही कहाण्या पाहू.

 (१) माझे मित्र च आदराचे स्थान असलेले प्रसिद्ध गांधीवादी व प्रसिद्ध लेखक श्री. श्रीपादराव जोशी यांच्या पत्नीची ही कहाणी आहे. या कुटुंबाशी माझे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. ही कहाणी १९९६-९७ सालची म्हणजे अगदी अलीकडची आहे. जोश्यांच्या पत्नीला मी माणिकताई या घरगुती संबोधनानेच हाक मारतो. त्यांना अधूनमधून औषधोपचारही मी करत असतो. ९६-९७ या काळात त्यांच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. मी औषधोपचार केले परंतु बरे वाटेना. इतरही अनेक डॉक्टर झाले पण उपयोग होईना. मला असेच वाटत होते की, बहुधा यांना जुनाट आव व नंतर उद्भवणारा पोटदुखीचा आजार असावा. मी त्यानुसारच औषधोपचार केले होते, पण काहीही गुण येईना. तेव्हा श्रीपादरावांचे कुटुंबाचे स्नेही व परदेशात पदवी मिळवून तेथेही अनेक शल्यकर्मे केलेल्या तज्ज्ञाकडे त्यांनी ही केस नेली. त्यांनी आपल्या इस्पितळात सौ. माणिकताईंना ठेवून घेतले व त्यांना असे वाटू लागले की, शौच व लघवी तुंबली असल्याने मोठ्या आतड्यात बिघाड

२१०