पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करत असेल तर त्यांना दोष देण्याची काही गरज नाही. येथे वृद्धत्वामुळे लैंगिक ओढ जवळ जवळ नष्ट झालेली असते. जरुरी असते ती समवयस्क, सुख-दुःखांत वाटेकरी होणाऱ्या जोडीदाराची.
 येथे एका समस्येला तोंड द्यावे लागते. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर जोडीदाराच्या वर्तणुकीमुळे जर असे सुपरिणाम घडत असतील तर त्यामागचे वैज्ञानिक कारण काय असावे? औषधोपचाराने दूर होणाऱ्या या गोष्टी नाहीत. उलट ताणतणाव, निराशा, अपेक्षाभंग, प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा अभाव हे जीवनाचे घटकच जर अस्तित्वात नसतील तर अकाली मृत्यू निश्चित. याच्या उलट हे घटक ज्यांचेबाबत उत्तम अस्तित्वात असतील तर त्यांचे अशक्य वाटणारे आजारही बरे होऊ शकतील. अनेक वैज्ञानिकांनी निरनिराळ्या देशांत ज्या पाहण्या केल्या त्यांचे निष्कर्ष असेच आलेले आहेत. आपल्या देहातील ज्या पेशी आपल्या प्रतिकारक्षमतेची उच्च पातळी राखत असतात त्यांना 'लिंफोसाईटस्' म्हणतात. त्यांचे दोन प्रकार आहेत. एक टाइप म्हणजे बी (B) पेशी व दुसरा प्रकार म्हणजे टी (T) पेशी. 'बी' पेशी ह्या 'अँटिबॉडीज' निर्माण करतात. उदाहरणार्थ समजा, एका जीवाणूने आपल्या शरीरावर हल्ला केला तर त्याचा प्रतिकार ह्या करतात. मात्र 'टी' सेल्स ह्या मुख्यतः टीश्यूंची प्रतिकारक्षमता वाढवत असतात. या प्रकारच्या प्रतिकारशक्तीमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ खुंटते व त्यांची वाढच होत नाही. तेव्हा कर्करोग फारशा औषधाशिवाय निश्चित बरा होऊ शकतो. प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे कसे घडवून आणावयाचे? हे जर काही मार्गाने घडवून आणता येऊ शकेल तर 'केमोथेरपी', 'रेडिएशन' अशा उपचारांचीही जरुरीच उरणार नाही. कारण या उपाययोजना कर्करोगाच्या पेशी मारतात त्याचबरोबर अनेक चांगल्या पेशीही मरत असतात. आणि एवढे होऊनही कर्करोग बरा होण्याची काहीच खात्री नाही. फक्त मृत्यू किती लांबला हेच पाहणे हातात उरते आणि जीवनाची गुणवत्ता (Quality of Life) नाहीशीच होते.
 श्लेफर या संशोधकाला असे आढळले की, जेव्हा पती व पत्नी यांपैकी एकजण प्रथम गेला त्या वेळी दुसऱ्याच्या देहातील 'बी' व 'टी' या पेशींच्या नेहमीच्या एकूण संख्येमध्ये काहीही फरक पडला नाही परंतु त्याची वर्तणूक बदलली होती. त्या चमत्कारिक वागत होत्या. सर्वसाधारणपणे काही रासायनिक अणू जर शरीरात १५३