पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रस्त्यात का शोधता आहात? यावर नसरुद्दिनचे उत्तर घरात काळामिट्ट अंधार आहे. येथे उजेड आहे, दिसते आणि म्हणून मी चावी येथे शोधत आहे." माधवराव जोश्यांच्या त्या काळी गाजलेल्या नाटकात एक पद आहे त्यात " आग सोमेश्वरी - बंब रामेश्वरी" अस एक कडवे आहे. ही गोष्ट आपल्याला लागू नाही का? अनेक विकारांचे मूळ कारण मनात असताना आपण मात्र त्याचा शोध देहात घेत असतो. याला अपवादही आहेत, पण तो नियम नाही. काहींच्या चाव्या आपल्याला सापडल्या आहेत, पण त्यापेक्षा जास्त हरवलेल्याच आहेत.
 रोगांचे मूलभूत कारणच न सापडल्यामुळे संशोधकांना जी निराशा येते, ते शोध न लागण्याचे कारण मानव स्वतःच या रोगनिर्मितीला कारणीभूत असतो. हे कारण बाहेरून आलेले नसते तर त्याची निर्मिती अंतर्गतच असते. हे त्या व्यक्तीने केलेले साहाय्यच असते. तेव्हा व्यक्तीचा विचारच पूर्णत्वाने होणे जरुरीचे. इतरांचे सोडा परंतु वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी कर्करोगाचे बळी झाल्याचे आढळले. चौकशी करता या विद्यार्थांचे आपल्या माता- पितरांबाबतचे संबंध अत्यंत परके, आपलेपणा नसलेले व जणू बर्फासारखे थंड होते व यामुळे त्यांच्या मनावर सतत ताण होता. हा ताण नष्ट करण्याची, किंवा त्याला प्रतिकार करण्याची त्यांच्यामध्ये कुवत नव्हती. हे ताण शरीर पोखरत पोखरत कर्करोगात रूपांतर पावले. स्तनाचा कर्करोग झालेल्या अनेक स्त्रियांची पाहणी केली असता असे आढळले की ज्या स्त्रियांना आपल्या हक्कांची जाणीव होती, ज्या आपल्या मतासाठी भांडत असत अशा स्त्रिया कर्करोग होऊनही ज्या स्त्रिया सोशिक वा सहनशील होत्या त्यांच्यापेक्षा जास्त काळ जगतात. नोकरदार विशेषतः उद्योगधंद्यातील लोक जर त्यांना नेहमी कराव्या लागणाऱ्या कार्यातून समाधान व आनंदच मिळत नसेल तर हृदयरोगाला लवकर बळी पडतात. उद्योगधंद्यात येणाऱ्या ताणतणावांना जे समर्थपणे तोंड देऊ शकत नाहीत तेसुद्धा हृदयविकाराचे फार लवकर बळी होतात. त्यांची या ताणतणावांना तोंड देण्याची ज्या मानाने क्षमता असते त्या मानाने या मृत्यूचे प्रमाण कमी- -जास्त होत असते. अशा या प्रकारांनी वैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या व्यक्तींच्या पदरी निराशा पडते. नसरुद्दिनच्या कहाणीप्रमाणे ते जेथे उजेड जास्त आहे तेथेच किल्ली शोधत बसलेले असतात. अशा अनेक जीवघेण्या रोगांबाबत मानवच दुबळ्या मानसिकतेद्वारे मोठ्या प्रमाणावर साहाय्यभूत होत १४७