Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याअंतर्गत समस्थिती राहते (Homeostatis) या शक्तीमुळेच शरीराच्या प्रत्येक पेशीचे पोषण, शरीराचे तापमान, रक्तावाटे होणारा योग्य पोषक घटकांचा पुरवठा, यांत निरोगी अवस्थेत काहीही बदल होत नाही. अशी समस्थिती ही शरीराचे दैनंदिन कार्य उत्तम प्रकारे होण्यास कारणीभूत असते. यामुळे पूर्वी रोग म्हणजे भयानक अवस्था अशी कल्पनाच अस्तित्वात नव्हती. पूर्वी संसर्गजन्य रोगही आपली प्रतिकारशक्ती कमी पडल्यामुळेच होतात ही धारणा होती. आज जीवाणूंमुळे विकार होतात हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे. परंतु कोणत्या जीवाणूंमुळे हे झाले आहे हेही 'पॅथोलॅब' आपल्याला सांगते. पण हे त्याचे अंतिम कारण आहे का? 'स्टेप्टोकॉक्स' या जीवाणूमुळे संधिवाताचा ताप येऊ शकतो, तसाच घशालाही रोगप्रसार होऊ शकतो किंवा काही लोकांच्या शरीरात हे जीवाणू जाऊनही ते आत असले तरी त्यांना काहीही होत नाही, किंवा काही जणांची प्रतिकारशक्तीच त्यांना पूर्णपणे नाहीसे करते.
 आपल्याला खरे म्हणजे आजही रोग / रोगजंतू यांचे पेशीवर होणारे परिणाम यांची पूर्ण कल्पना नाही, आणि आपण आहे म्हणून समजतो ही कल्पना अतिशय धू आहे. असे मानण्यात येते की विकार म्हणजे काय? तो कशामुळे होतो व तो कसा शोधावा? कसा पाहावा? हे ज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर आले आहे. पण हीसुद्धा एक कल्पनाच आहे पूर्ण सत्य नाही. आपल्याला आजही एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस मानवी देह म्हणजे काय? माणूस म्हणजे काय, हे पूर्णार्थाने समजलेले नाही. आधुनिक वैद्यकाने मिळविलेल्या यशापेक्षा अज्ञानच मोठे आहे. शरीर व मन ही एकरूप आहेत. फक्त शरीराचा विचार हा नेहमीच अति अपुरा असतो. याचा अर्थ असा की विकाराचा शोध आपण मानवाच्या अशा भागात घेतो की ज्या भागाची आपणास पूर्ण माहिती आहे (तो भाग म्हणजे देह). या वृत्तीचे विडंबन करणारी एक कथा प्रसिद्ध आहे. "मुल्ला नसरुद्दिन हा सूफी पंथाचा धर्मगुरू. नसरुद्दिनच्या घराची चावी हरवली. तो ही चावी हातावर व गुडघ्यावर रांगून, रस्त्यात शोधत होता. त्या वाटेने त्याचा एक मित्र जात होता. त्याने नसरुद्दिनला विचारले की मुल्लाजी काय शोधता आहात? नसरुद्दिनने घराची चावी असे उत्तर दिल्यावर, मित्र म्हणतो की चावी कोठे हरवली? या रस्त्यावर का? नसरुद्दिन म्हणतो की येथे नाही, ती घरात हरवली आहे. मित्र विचारतो की मग ती तुम्ही

१४६