पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १३ : : श्रमणांची कर्तव्ये [ गौतम बुद्धाच्या नियणानंतर लवकरच बौद्ध भिक्षुकांची मोठी सभा राजगृह येथे झाली. या सभेत बुद्धाने केलेला उपदेश एकत्र संग्रहीत करण्यांत आला. ही बौद्धांची पहिली महासभा होय. शंभर वर्षानंतर दुसरी सभा वैशाली येथे आणि तिसरी अशोकाच्या वेळीं पाटलिपुत्र येथे झाली. या महासभांतून धार्मिक साहित्याचे संहितीकरण करण्यांत आले. त्याचे १ धम्म, २ विनय, ३ अभिधम्म असे तीन भाग आहेत. या सर्वांस मिळून ' त्रिपिटक (तीन पेट्या) असे म्हणतात. धम्मपदामध्ये बुद्धाने केलेला उपदेश संग्रहीत आहे. ‘विनया'मध्ये भिक्षुच्या आचरणाचे नियम सांगितलेले आहेत आणि 'अभिधम्मांत' बौद्धांचे तत्त्वज्ञान ग्रथित केलेले आहे. 'त्रिपिटक' पाली भाषेमध्ये लिहिलेले आहे. या सर्वांत धम्मपदाचे महत्त्व विशेष होय. मूळ पालीमधील या ग्रंथाचे भाषांतर जगांतील अनेक भाषांमध्ये झालेले आहे. त्यांतील कांहीं श्लोकांचा अर्थ पुढे दिलेला आहे. त्यावरून बौद्ध धर्माची शिकवण कळून येईल. प्रस्तुत भाषांतर, भिक्षु आनंद कौसल्यायन यांनी केलेल्या हिंदी अनुवादाच्या आधारे केलेले अाहे. प्रारंभीं श्लोकांचे आंकडे आहेत. श्लोकांचा अनुवाद विषयानुसार परिच्छेद करून येथे दिला आहे] (१४१) ज्या मनुष्याच्या वासना शिल्लक आहेत त्याची शुद्धि लंगोटी नेसल्याने, जटा वाढविल्याने, चिखल (अंगास) फासल्याने, उपवास करण्याने, कठिण जमिनीवर झोंपण्याने, भस्म लावल्याने अथवा उकिडवे बसण्याने होत नाही. (१४२) अलंकार अंगावर असतांहि जर त्याचे आचरण सम्यक् असेल, तो शान्त व दान्त असेल, नियत ब्रह्मचारी असेल, तर आणि त्याने कोणत्याहि प्राण्याला शिक्षा करण्याचे सोडून दिले असेल तर तोच ब्राह्मण आहे, तोच श्रमण आहे आणि तोच भिक्षु आहे. (१८३) कोणते हि पाप न करणे, पवित्र कार्य करणे, चित्त शुद्ध राखणे ही बुद्धाची शिकवण होय. (२२०) पुष्कळ काळ विदेशांत राहून सकुशल परत आल्यावर जात, बंधु, मित्र जसे त्याचे अभिनंदन करतात, तसे या लोकांतून परलोकांत येल्यावर पुण्यवान् पुरुषाचे पुण्य त्याचे स्वागत करते. (२२४) सत्य बोला, क्रोध करू नका, कोणी मागितल्यास थोडे असले तरी द्या, या