पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

१८ पेन्स नकोत, रुपयास १६ च पेन्स पाहिजेत असा हट्ट कां ! आणि त्याबद्दल देशाचे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एवढी ओरड कां ?

" गैर समाजाचें निरसन "

 हें कोडें अर्थशास्त्रांतील खालील सिद्धांत आपले लक्षांत येतांच उलगडतें, रुपया हें चलन आहे, म्हणजे वस्तू विकत घेणेचे साधन आहे आणि चल. नाची म्हणजे साधनाची किंमत वाढली म्हणजे त्याचे वस्तू विकत घेण्याचे सामर्थ्य वाढतें, म्हणजेच पदार्थोंचें बाजारभाव उतरतात; याचाच अर्थ स्वस्ताई होते, व चलनाची म्हणजे पदार्थ विकत घेणेच्या साधनाची किंमत उतरली म्हणजे त्याचे पदार्थ विकत घेण्याचे सामर्थ्य कमी होते; म्हणजे वस्तूंचे बाजारभाव चढतात याचाच अर्थ महागाई होते.
 तसेंच वरील कारणामुळेंच चढती हुंडणावळ देशाच्या निर्गत मालास अटकविणारी असून आयात मालास उत्तेजक असते; याचे उलट उतरती हुंडणावळ देशाचे निर्गत मालास उत्तेजक व आयात मालास अटकविणारी असते.
 हिंदुस्थान देश शेती प्रधान असल्यामुळे प्रतिवर्षी या देशांतून धान्य व कच्चामाल परदेशी जातो, त्यामुळे १६ पेन्साचा रुपयाचा भाव असता परदेशीं खपलेल्या आपल्या मालाबद्दल १ पाडास १५ रुपये मिळत तेथें १८ चेन्साचा भाव झाल्याने आपले पदरांत ( १३ रु. ५ आ. ४ पै पडतात परंतु हिशेबाचे सोईकरिता १३ रु. ८ आ. घरले आहेत ) १३०८ रुपयेच फक्त मिळतात आणि म्हणून आपले निर्यात सालाबद्दल आपणास कमी रक्कम येते व अशा रितीनें आपलें नुकसान होतें, तसेंच परदेशचे आयात मालाबद्दल १६ पेन्सांचा दर असतां एक पौंडाचे मालास आपणास १५ रुपये पडत होते, तेथें आतां १३०८ रुपयेच पडूं लागल्यामुळे परदेशी माल येथे स्वस्त येऊन पडून येथील कारखान्यांत तयार झालेल्या मालाचे स्थानिक पांत जरूर तेवढा नफा न सुटल्यामुळे येथील कारखाने डबघाईस येतात, व अशा रीसनिंही देशाचे नुकसान होतें.