पान:वनस्पतिविचार.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १४१
-----

वयाचे असेल, तर एका काचेच्या तुकड्यावर पाण्याचे थेंबांत एका बाजूस ह्या पेशीमय वनस्पति ठेवाव्यात, व दुसरे बाजूस त्याचप्रमाणे हिरवळ वनस्पति पाण्यांत ठेवाव्यात. हा काचेचा तुकडा सूर्य प्रकाशांत ठेविला असतां हिंरवळ घनस्पति कार्बन संस्थापन करून ऑक्सिजनवायू हवेत सोडू लागतात. दुसरे बाजूस असणाऱ्या थेंबांतील एकपेशीमय वनस्पति आपली मूळ जागा सोडून ऑक्सिजन वायूकडे जाऊ लागतात. ऑक्सिजन वायूचा उत्तेजित परिणाम ह्यांवर होतांना चांगला स्पष्ट दिसतो. उसाच्या साखरेपासून शैवालतंतूवर असाच उत्तेजित परिणाम होत असतो. फर्न किंवा सिलॅॅजिनेलॉस नांवाच्या क्षुद्र वनस्पतीपासून पाण्यांतून जी पूंजातीतत्त्वे स्त्रीजातीतत्त्वाकडे आकर्षित होतात, त्याचे कारण स्वीतत्त्वामध्ये मॅलिक अॅसिड असते. ह्या आमलाचा परिणाम पुंजातीतत्त्वावर नेहमी होतो. पाण्यातून हीं पुंतत्त्वे जातांना वाटेत हे आम्ल एका नळीत धरिले असता ती सर्व पुंतत्त्वे नळीकडे धाव घेऊन पुढे स्त्रीजातीतत्वांकडे जात नाहीत. असले चमत्कार वारंवार पाहण्यांत आल्याकारणाने एवढे सिद्ध ठरतें कीं; बाह्य रासायनिक वस्तूंचे जीवनकणांस उत्तेजन मिळून प्रत्युत्तर त्याजकडून चमत्काररूपाने मिळते.

 एकंदरीत बाजूचा सूर्यप्रकाश, गुरुत्वशक्ति, स्पर्श, पाण्याचे अस्तित्व, अथवा रासायनिक उत्तेजन ह्यांचा परिणाम वनस्पतीवर नेहमीं दृष्टोत्पत्तीस येतो. पेशींचा निरनिराळा ताण व त्यामुळे उत्पन्न होणारी गति ही चमत्कारांचे निदर्शक होत.

 ज्ञानतंतु:--वरील विवेचनावरून असे अनुमान काढिता येईल की, प्राणिवर्गाप्रमाणे वनस्पतिवर्गासही ज्ञान असते व ते व्यक्त करणे म्हणजे उत्तेजनास जबाब देणे होय. प्राणिवर्गामध्ये ज्ञानतंतु व तत्संबंधी जी विशिष्ट व्यवस्था आढळते, ती वनस्पतिवर्गामध्ये सांपडणे कठीण आहे. तथापि वनस्पतीस थोडेबहुत ज्ञान असते व ते त्या निरनिराळ्या गोळींनी व्यक्त करीत असतात. शिवाय सर्व प्राणिवर्गामध्ये एकच प्रकारची ज्ञानव्यवस्था कोठे असते ? क्षुद्र प्राण्यापासून तो उच्च प्राण्यापर्यंत ज्ञानतंतूची पायरी हळू हळू अधिक जास्त होत असते. क्षुद्र प्राण्यांत ज्ञानतंतु असतात किंवा नाही याची शंका वाटते; पण जसे जसे प्राणी अधिक उच्च वर्गीय असेल त्या मानाने अधिक ज्ञानतंतु व मेंदूची विशिष्ट रचना आढळते. ज्या प्राण्याची शरिरचना साधी असते, त्यामध्ये ज्ञानतंतुव्यव-