पान:भाषाशास्त्र.djvu/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ भाषाशास्त्र, व्याकरण, अथवा शब्दव्युत्पत्तिमीमांसा. आतां, शब्दांचे विवरण, अथवा वाक्याचे निरूपण, | किंवा अर्थाचे स्पष्टीकरण, इत्यादि सबभाषानिरूपणार्थ पहिला प्रयत्न ब्राह्मणे. धाने आमच्या आर्य पूर्वजांचा पहिला प्रयत्न म्हटला म्हणजे निःसंशय ब्राह्मर्णच होत. आणि ह्या ब्राह्मणांचा मूळ व मुख्य हेतु काय असावा, याजवर आपण चांगले लक्ष पुरविले, तर आपत्यास असे दिसून येईल की, संहितेतील यज्ञविषयक गूढ ऋचांचा योग्य अर्थ सर्वस समजावा, व यज्ञक्रिया बरोबर व्हाव्या इतकाच होता, यांत बिलकुल संशय नाही. कारण, यज्ञविधीच्या संबंधाने, भिन्न भिन्न ऋषींची निरनिराळी मते पडल्यामुळे, अमुक मत खरे आहे, किंवा अमुक ऋचेचा अर्थ अमुक तव्हेने केला पाहिजे, अथवा एकंदर तात्पर्यर्थ अमुक रीतीनेच समजला पाहिजे, असे ब्राह्मणांत सांगितले असल्याचे तदवलोकनाने चांगले व्यक्त होते. अर्थात्, यज्ञ व त्यांचा विधि, आणि मंत्र व तदक्त क्रिया, यांची एकवाक्यता अमुक प्रकारे होते; अथवा, ती होण्यासाठी त्यांचा अर्थ अमुक तव्हेने केला पाहिजे; अगर त्यांची व्यंजकता अमुक रीतीचेच विवरण केल्याने होण्यासारखी आहे; इत्यादि विवेचन ब्राह्मणांत सांगितले असून, ह्याच कारणासाठी, त्यांस ६ व्याख्याविषयक आदिलेख असें ह्मणावे लागते. | १ ह्यासंबंधाने रॉथ म्हणतोः– The oldest attempts at interpretation seem to be contained in Bráhmans, in collections of passages ( nigama ), in collections of words ( Raighantu ), and in explanations ( mi weta ),* * * * * ( पुढे चालू. ) ।। ।