पान:देशी हुन्नर.pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६९ ]

याचें कारण त्याच्या अंगचा सोन्यासारखा मोहक रंग हें असावें. पितळ चकचकीत ठेवण्यास मेहनत फार लागते, म्हणून काशाची भांडीं वापरण्यांत येऊ लागली असावींत. कासे, चार भाग तांबें व एक भाग कथील, यांच्या मिश्रणानें होतें असें म्हणतात. पितळ, तीन भाग तांबें व एक भाग जस्त यांपासून होतें. मुसलमान लोक पितळेच्या भांड्यांपेक्षां तांब्याचीं भांडीं फार वापरतात, व त्यांस ते आंतून बाहेरून कल्हई लावितात.

सोन्यारुप्याचीं भांडी.

 ऋग्वेदांत सोन्याच्या भांड्यांचें वर्णन आहे हें मागे सांगितलेंच आहे. प्राचीन ग्रंथांतून सुद्धां याविषयीं उल्लेख आहेतच. आनंद प्रदर्शित करण्याकरितां एकमेकांस नजराणा द्यावयाचा तो सोन्याच्या तबकांत घालून पाठवीत असत, असें सर एडविन आरनोल्ड यानें कपिलवस्तु या गांवीं सिद्धारथ राजपुत्राच्या जन्माचें वर्णन करितांना लिहिलें आहे. फार प्राचीनकाळचीं सोन्याचीं भांडीं आपल्या देशांत हल्लीं कोठें शिल्लक असतील कीं काय तें कळत नाहीं. असल्या मौल्यवान जिनसा मोठमोठ्या राजवाड्यांत किंवा जुनाट देवस्थानांत असावयाच्या. परंतु राज्यक्रांतीमुळे या दोन्हीही ठिकाणीं इतकी उलथापालथ झाली आहे कीं तिच्यामुळें बहुतेक सर्व मौल्यवान धातू सोनाराच्या मुशीत ओतल्या जाऊन त्यांचें पुनःपुनः रूपांतर झालें असावें अशी आमची समजूत आहे. तशांतून एखादा जिन्नस चुकून कोठें राहिला असला तर तो किती वर्षांचा जुना आहे हें कळण्याची पंचाईत पडते कारण आमचे इतिहाससुद्धां कवी राजांच्या हातीं सांपडून रूपांतर पावले आहेत. सर जॉर्ज बर्डवूड या प्रसिद्ध विद्वानाचें मत असें आहे कीं जलालाबाद या गांवीं एका बौद्ध इमारतींत एक पंचपात्री सांपडली आहे तिच्यापेक्षां जुनें सोन्याचें भांडें कोठें आढळण्यांत नाहीं. या पंचपात्रीत कांहीं नाणीं होतीं त्यावरून ती येशु ख्रिस्ताच्या पूर्वी ५० वर्षे राज्य करीत असलेल्या एका राजाच्या वेळीं घडली असावी असें दिसतें.

 या सुवर्णपात्राविषयीं साहेब महशूर यांच्या पुस्तकांत खालीं दिलेल्याप्रमाणें मजकूर दिला आहे.
 "या पंचपात्रीचा वरचा व खालचा गलथा या दोहींस माणकें जोडलेलीं आहेत, व त्यांच्या मधून मधून श्रीवत्स काढले आहे. तिच्या चौफेर आठ