पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Co तांना इतकी सावधगिरी बाळगण्यांत आली होती कीं, पहिल्या तिमाहीस अवघे १७९९ पौं. चें भांडवल या वखारीच्या उभारणीस जमा करण्यांत आलें होतें, आणि वखारीची विक्री अवघी ९६९७ पैों. ची झाली होती. आज मित्तीस सबंध ग्रेटब्रिटनभर अन्य ठिकाणीं या वखारीचें जाळे पसरलें आहे. लंदन येथीन प्रसार. कोकोचा कारखाना, कॉफीची वखार, सिलोन मधील चहाचे मळे वगैरे अनेक प्रचंड कारखाने निव्वळ संयुक्त किंवा संघवळावर, सहकारितेच्या भरंवशावर यांनीं काढलेले आहेत.