पान:अशोक.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थानिक अधिका-यांच्या कामाची तपासणी करतात. व प्रसंगविशेषीं ते ही तों कामें करतात. वतनदार अधिकारी असण्याची आवश्यकता ज्या कारणांमुळे जातिजातींना वाटू लागली, त्याच कारणांमुळे ती गांवांनाही वाटू लागली; आणि इष्ट तो फेरफार करून जात-वतनदारांच्या नमुन्यावर गांवानें जाति जातीपासून उचलली किंवा जातीजातींनीं ती गांवगड्यापासून उचलली हें निश्चयानें ठरविण्यास अगोदर गांवें वसलीं किंवा अगोदर जाती बनत्या हें समजलें पाहिजे. गांवांत कायमची वस्ती करून राहिलेल्या जाती जरी पुष्कळ आहेत तरी हल्लींच्या सुरक्षित राज्यांतही शेंकडीं फिरत्या जाती दृष्टीस पडतात. कायमच्या धंद्याची आवश्यकता व वृद्धि ह्यांमुळे ह्या फिरत्या जातींनाही स्थाईक होणें भाग पडत आहे; आणि वंजारी, ;ी, जोशी, तिरमल, घिसाडी, वडुर वगैरे जाती आपापल्या सोयीप्रमाणें कांहीं गांवांत घरेंदरें करून राहिल्या आहेत. ह्यावरून असा ग्रह । होतो कीं, अगोदर जाती निर्माण होऊन त्या भटकत भटकत सोयीसोयीनें गांवांत स्थिरावल्या असाव्यात, आणि जातवतनदारीचा ठसा गांवमुकादमानीवर उमटला असावा. राजाची गादी वंशपरंपरेनेंरंपरेनें चालते हें पाहून समाजव्यवस्था अखंड चालविण्यासाठीं जातीजातींनीं आपापले कामगार वतनी केले, व जाति-पोटजातींची संख्या सहस्रावधि असल्यामुळे गांवोगांव वतनी जात-कामगार फडकू लागले. जातीचे अधिकार आधुनिक मताप्रमाणें निर्मळ सामाजिक नसून त्यांनीं राजसत्ता व धर्मसत्ता ह्यांचाही पुष्कळसा भाग व्यापला आहे. तेव्हां जातिजातींनीं मान्य केलेल्या वतनपद्धतीचीं मुळे राजसत्ता व धर्मसत्ता ह्यांतही ओघानेंच शिरली. गुणांवरून राजाधिकारी ‘व धर्माधिकारी नेमण्याचा प्रघात समाज ज्या संस्था पसंत करतो त्यांचा प्रवेश राज्यव्यवस्था व - व्यवस्था ह्यांत झाल्याशिवाय रहात नाही. एकंदर लोकप्रवृाने वतनाका