पान:Poster Smart Phone.pdf/१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हांला तुमच्या फोनपेक्षा हुशार व्हायच आहे?

२दा विचार करा! हे कायम लक्षात ठेवा की, असा कोणताही मेसेज तुम्ही पाठवू नका ज्यामुळे तुम्हांला नंतर पश्चाताप होईल. तुमचे सगळे मेसेज दुसर्‍यांकडून वाचले जाऊ शकतात आणि त्यांचा मागोवा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हांला आलेले मेसेज कुणी पाठवले आहेत याच्यावर लक्ष ठेवा. अनोळखी लोकांच्या मेसेजला रिप्लाय देऊ नका.

तुम्हांला नंतर पश्चाताप होईल ! ज्यांना तुम्ही फक्त ऑनलाईनच ओळखता आहात अश्या कोणालाही तुमचे फोटो पाठवू नका. जर असं कुणी मागत असेल तर लगेचच तुमच्या घरातील मोठ्या लोकांशी ह्याबाबत बोला.

हुशारीने लोकांमध्ये मिसळा! एकदा का तुम्ही एखादी गोष्ट, फोटो किंवा व्हिडीयो इंटरनेटवर टाकलात की तो परत मागे घेणे खुपच कठीण आहे हे लक्षात ठेवा, तो फोटो, व्हिडीयो तुमच्याकडून कॉपी करुन घेतला जाऊ शकतो. तो दुसरीकडे कश्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. तुमच्या नावाने तुमचे किंवा तुमच्या मित्रांचे खोटे खातेप्रोफाईल तयार केले जाऊ शकते. तुमच्या फोनमध्ये असलेले ऍप्स तुमच्या फोनवरील माहिती वाचू शकतात त्यामुळे तुमच्या फोनवर काहीही टाईप करताना काळजी घ्या.

फोन ही खाजगी गोष्ट आहे! तुम्ही तुमच्या गैरहजेरीमध्ये दुसर्‍यांना तुमचा फोन वापरू देणं म्हणजे त्यांना तुमच्या सोशल नेटवर्क प्रोफाईलचा पासवर्ड दिल्या सारखेच आहे. जेव्हा तुम्ही वापरत नसाल तेव्हा तुमचा फोन लॉक करुन ठेवणे ही चांगली बाब आहे. तुमची खाजगी माहिती अनोळखी लोकांना ऐकू जाईल अश्या ठिकाणी आणि अश्या आवाजात सांगू नका. ज्यांना तुम्ही ओळखत नाही अश्यांना तुमचा फोन नंबर देऊ नका.

अरे देवा, हे खरं असूच शकत नाही ! अश्या कोणत्याही भूलथापांना बळी पडु नका, ज्या अगदी समोरच खोट्या दिसत आहेत. खुपच जास्त चांगल्या दिसणार्‍या ज्या खोट्याच असू शकतात अश्या कोणत्याही ऑफरच्या लिंक्सवर कधीच क्लिक करु नका.

लगेचच तक्रार नोंदवा! जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर लगेचच तुमच्या घरातील मोठ्यांना सांगा, फोन हरवल्याचीध्चोरी गेल्याची माहिती लागलीच तुमच्या सर्वि्हस प्रोव्हाईडर पर्यंतध्फोन कंपनी पर्यंत पोहचवा. जर फोन चोरी गेला असेल तर तुम्हांला पोलिसांकडेही तक्रार करावी लागेल.

फोटोचे प्रोब्लेम्स? कुणाचाही फोटो किंवा व्हिडीयो काढायच्या आधी तुम्ही त्यांची परवानगी घ्या, त्यांना विचारा की तो फोटो घेऊन तुम्ही इंटरनेटवर टाकू शकाल का? कुणाचाही फोटो किंवा व्हिडीयो त्यांच्या परवानगी शिवाय इंटरनेटवर टाकू नका. शिवाय पार्टी किंवा सगळे एकत्र आलेले असताना तुमचे फोटो कुणी तुमच्या नकळत काढत नाहीये ना? याच्याकडे लक्ष द्या, जर तसे कोणी करत असेल तर त्यांना तसे न करण्याबद्दल सांगा. कदाचित तुम्हांला त्यांनी काढून इंटरनेटवर टाकलेल्या फोटोमध्ये दिसणे, टॅग केले गेलेले चालणार नसेल. त्याचबरोबर तुम्ही इंटरनेटवर टाकलेल्या फोटोंचे प्रायव्हसी सेटींग चेक करा.

फोन वापरून त्रास देणे हल्ली मोबाईल फोन आणि इंटरनेटवर आपण अगदी प्रत्यक्ष माणसांमध्ये वावरतो तसेच वावरत असतो. त्यामुळे मोबाईल फोन वर बोलणार्‍या आणि इंटरनेटवर बोलणार्‍या माणसांना प्रत्यक्ष भेटणार्‍या माणसांसारखेच लक्षात घ्या, जे तुम्ही प्रत्यक्षातल्या माणसांबरोबर बोलणार नाही किंवा करणार नाही ते इंटरनेटवर किंवा फोनवरही करु नका बोलू नका.

मला नाही आवडले! तुम्हांला जे बघायला, वाचायला, ऐकायला आवडणार नाहीत असे कोणतेही मेसेज जर तुम्हांला कोणी पाठवत असेल तर ताबडतोब त्याबाबत तुमच्या घरातल्या मोठ्यांना त्याबाबत सांगा.

लोकेशन शेयरींग लोकेशन शेयरींगची सोय तुम्ही अश्याच मित्रांबरोबर वापरा ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष ओळखता आणि तेव्हाच वापरा जेव्हा त्याबद्दल निटशी माहिती असेल.

फक्त समोरा-समोर महत्वाच्या मुद्यांवर बोलण्यासाठी नेहमीच समोरा समोर भेटा.

तुम्ही हुशार व्हा, हा पुर्णपणे तुमचा निर्णय आहे, पण तुम्हांला सांभाळूनच रहावे लागणार आहे!

जरी मोबाईल फोन आपल्या कुटुंबाशी आणि मित्र-मैत्रीणींशी संपर्कात रहाण्यासाठी खुपच चांगली गोष्ट आहे तरीही मोबाईलबाबत आपल्याला खुप गोष्टी जबाबदारीने वापराच्या आहेत हे ही लक्षात ठेवा.