पान:Ganitachya sopya wata.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
∴ 9.20
- 5.48
-------
3.72 अशी वजाबाकी करायची.

सरावासाठी पुढील बेरजा व वजाबाक्या करा.

(1) 425.02 + 107.8

(2) 13.65 + 6.927

(3) 913.04 - 68.72

(4) 49.6 - 24.835

(5) 80.16 - 16.64

आता व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या रूपात कसे लिहिता येतात ते पहा - 3/5 चे दशांश रूप हवे असेल तर सरळ भागाकार करायचा व 3 = 3.0 = 3.00 = 3.000 हे लक्षात ठेवायचे. नेहमीप्रमाणे भागाकार करायचा पण दशांश टिंबानंतरचे आकडे खाली उतरवायला सुरुवात केली की भागाकाराच्या संख्येतही दशांश टिंब लिहावे लागते 3/5 ला दशांश रूप देऊ या -

या ठिकाणी दशांश टिंबानंतर एक शून्य खाली नेल्यानंतर पूर्ण भाग गेला व बाकी शून्य आल्यामूळे 2 भागाकार पुरा झाला पण



/4 या अपूर्णाकाला दशांश रूप देताना काय होते पहा


म्हणजे या ठिकाणी दशांश टिंबानंतरची दोन शून्ये घ्यावी लागली तेव्हा भागाकार पुरा झाला.



दशांश अपूर्णांक
४७