पान:Ganitachya sopya wata.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



असतील तेवढी शून्यं एकावर ठेवून तो छेद व टिंबानंतरची संख्या हा अंश असा तो अपूर्णांक असतो. आता कुठलीही तीन आकड्यांची संख्या 1000 पेक्षा, 2 आकड्यांची संख्या 100 पेक्षा, एक आकड्याची संख्या 10 पेक्षा व चार आकड्यांची संख्या 10000 पेक्षा लहान असते म्हणून टिंबा नंतरचा अपूर्णांकाचा भाग हा नेहमी एकाहून लहान असतो कारण तो व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिला की अंश हा छेदापेक्षा लहान असतो. पुन्हा एकदा पुढील दशांश - व्यवहारी अपूर्णाक ही रूपे पहा -

4.73 = 473/100

25.08 = 258/100 (इथे टिंबानंतर 0 व 8 हे दोन आकडे आहेत म्हणून छेद 100 व 08 = 8)

.2 = 2/10

6.001 = 61/1000

आणखी एक गंमत पहा -

5.2 = 5 2/10

5.20 = 520/100 = 52/10 (10 ने अंश व छेद यांना भागले)

5.200 = 520/1000 = 52/10 (100 ने अंश व छेद यांना भागले)

∴ 5.2 = 5.20 = 5.200 = 5.2000 = 5.20000 हे लक्षात आलं का ? थोडक्यात, ध्यानात ठेवण्यासाठी - दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत दशांश टिंबानंतरची जी संख्या असते तिच्या पुढे कितीही शून्ये लिहिली तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही -

तसेच 3.48 = 03.48 = 003.48



दशांश अपूर्णांक
४५