पान:Ganitachya sopya wata.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सरळव्याज

सरळ व्याजाने कर्जाऊ पैसे घेतले तर त्यासंबंधी गणिते देखील गुणोत्तर प्रमाणाचा उपयोग करून, चटकन करता येतात. इथे दरवर्षी व्याजाचा दर तोच कायम असतो. द. सा. ६. शे. म्हणजे दर साल दर शेकडा किंवा '100 रु वर प्रत्येक वर्षी' असा अर्थ आहे. व्याजाचा दर द. सा. द. शे. क्ष रु. म्हणजे 100 रु. मुद्दल किंवा कर्जाऊ रक्कम असेल तर दर वर्षी क्ष रु. व्याज द्यायचे. म्हणजे व्याज/मुद्दल हे गुणोत्तर दर वर्षी कायम असते. व जेवढी वर्षे मुदत असेल, तेवढ्या पटीने व्याज वाढते. साध्या गुणोत्तराच्या गणितापेक्षा ही गणिते किंचित क्लिष्ट असतात कारण व्याज/मुद्दल या गुणोत्तराबरोबरच मुदतीची वर्षे किती याचाही विचार करावा लागतो. पुढील शब्दांचे अर्थही ही गणिते करण्यापूर्वी लक्षात ठेवा. मुद्दल = कर्जाची रक्कम

रास = मुद्दल + व्याज

आता काही नमुन्याची उदाहरणे पहा -

उदा. १ दर साल दर शेकडा 12 रु. दराने, 600रु. कर्जावर 4 वर्षात किती व्याज द्यावे लागेल ?

प्रथम 100 रु. वर 4 वर्षात किती द्यावे लागेल ते पाहू. दर साल दर शेकडा 12 रु. म्हणजे 100 रु. मुद्दलास एका वर्षात 12 रु.

∴ 100 रु. मुद्द्लास 4 वर्षात 12 x 4 = 48 रु. व्याज पडेल.

आता 4 वर्षाचे व्याज/मुद्दल हे गुणोत्तर मिळेल. ते 48/100 असे आहे.

600 रु. मुद्दलावर 4 वर्षात 'व' व्याज द्यावे लागेल असे मानले तर 4 वर्षांचे व्याज/मुद्दल हे गुणोत्तर /600 असेही मिळते.

/600 = 48/100
∴ व = 48/100 x 600



सरळव्याज
३५