पान:Ganitachya sopya wata.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (6) मंदीमुळे कारखान्याच्या कामगारात 18% कपात करण्यात आली तर 2500 कामगारांपैकी किती कामगारांना काढले ?

नफातोटा
एखादी वस्तु एका किमतीस विकत घेऊन दुस-या किमतीस विकली की फायदा म्हणजे नफा, किंवा तोटा होतो. जास्त किंमतीस विकली तर नफा व कमी किमतीस विकली तर तोटा होतो हे तुम्हाला

माहीत आहे ना ? विक्रीची किंमत जास्त असेल तर

नफा = विक्री कि. - खरेदी किं.
उलट विक्रीची किंमत कमी असेल, तर
तोटा = खरेदी किं. - विक्री कि.
आता शेकडेवारीच्या भाषेत नफा तोट्याची गणिते कशी करतात ते पाहूं. एक लक्षात ठेवा की
नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदीच्या किंमतीवर शेकडेवारीने मोजला जातो.

100 रु. खरेदीवर 10 रु. नफा झाला तर शेकडा 10 नफा किंवा 10% नफा झाला असे म्हणतात. त्यावेळी विक्रीची किंमत खरेदीपेक्षा 10 रु. जास्त म्हणजे 110 रु. असते.

100 रु. खरेदीवर 10 रु. तोटा झाला तर शेकडा 10 तोटा किंवा 10% तोटा झाला असे म्हणतात. त्यावेळी विक्रीची किंमत खरेदीपेक्षा 10 रु. नी कमी म्हणजे 90 रु. असते.

पण दोन्ही ठिकाणी खरेदीची किंमत 100 रु. आहे.

नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी माहीत असेल, तर नफा / खरेदी किंवा तोटा /खरेदी हे गुणोत्तरप्रमाण चटकन मिळते. आता हे उदाहरण पहा.

नफातोटा
29