पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
७८ ]

[माझा जन्मभरचा


कारणच झालें असतें. जुन्या काळासारखी अितर ग्रंथांप्रमाणें नाटकें ही नुसत्या वाङ्मयलेखनाची अेक गोष्ट असती तर वेगळें. पण नाटक लिहिलें आणि त्याचा प्रयोग न झाला तर ते फुकट श्रम झाले असें वाटू लागलें होतें. नाटकांत चित्रें घालावयाचीं तर तीं नटांच्या प्रवेशांचीं. पण प्रयोग बसल्याशिवाय अशीं चित्रें कशीं मिळणार ? चित्रांची सवय लोकांना लागल्याने बिनचित्रांची नाटकें छापलीं तर कशीं खपणार? अशा रीतीने या विषयांत पायांत पाय अडकून राहिले होते. रंगभूमीवर यशस्वी न झालेलीं अशींहि कांही नाटकें नाटक कंपन्यांनी स्वीकारल्याचें दिसत होतें. पण तो जुलमाचा रामराम व भिडेची भीक होती. शिवाय ज्यांचीं नाटकें स्वीकारलीं गेलीं त्यांतल्या कांहीचे कर्ते स्वाभिमान सोडून नाटक कंपनींत कशा लाचारीने लाळघोटेपणा करीत, किंवा निदान तद्रूप होअून जात, याची बाहेर पुष्कळांना माहिती नसते. नाही म्हणावयाला देवल-खाडिलकर व कोल्हटकर हेच प्रतिष्ठा ठेवून खरोखर 'मास्तर' या शब्दाला अुचित अशा मानाने आपली वागणूक नाटक कंपन्यांत ठेवीत. रा. गडकरी यांच्या नाटकावर पुढे पुढे पुष्कळ अुड्या पडत हें खरें, तथापि त्यांचा अुल्लेख या बाबतींत देवल-खाडिलकर यांच्या बरोबरीने करता येत नाही. गडकऱ्यांना आपलें नांव अडचणींतून कसें तरी वर काढावयाचें होतें. त्यांना निर्वाहाचें अितर साधन नव्हतें. या गोष्टीमुळे त्यांना प्रथम प्रथम नाटक कंपन्यांतून मुलांचे मास्तर पण मालकांचे पगारी नोकर अशा नात्याने राहावें लागे. कोल्हटकर यांचा संबंध नाटक कंपन्यांशीं देवल खाडिलकर यांच्यापेक्षाहि कमी येअी. पण ते जरी मानी होते तरी कंपनींतील लोकांशी आढ्यतेने वागत नसत. समरस होऊन जात.
 (६४) नाटक कंपन्यांचा मीहि अेक ऋणानुबंधी होतों. पण माझा त्यांच्याशीं संबंध अर्थातच या सर्वांपेक्षाहि कमी येअी. किर्लोस्कर कंपनीने आपले अेक पुरस्कर्ते म्हणून, पूर्वीच्या प्रो. आगरकरांच्या जागीं आपल्या हँडबिलावर, डॉ. गर्दे यांच्याबरोबर माझें नांव घालण्याचा मान दिला होता (सन १८९८ पासून). तथापि कंपनींत माझें प्रत्यक्ष जाणें-येणें अगदीच जुजबी व कारणपरत्वें असे. तसेंच " 'तुम्ही लिहून द्याल तसलें नाटक आम्ही करूं. तुम्हांला त्याची कां पंचाअीत ?" असें किर्लोस्कर