पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ७७


गडकरी यांचीं नाटकें रंगभूमीवर पाहत असतां मी मुंबअीच्या या जुन्या नाटकगृहांत बसलों आहें की काय असा मला पुष्कळ वेळां भ्रम होअी !
 (६२) माझ्या या नाट्याच्या आवडीचा परिणाम ग्रंथलेखनांत मात्र लवकर दिसून आला नाही. १८९४ मध्ये मी शेरिडनच्या 'रायव्हलस् 'चें भाषांतर केलें ; पण तें केवळ वेळ जाण्याकरिता, करमणुकीकरता. पुढील साली बंगाली भाषा शिकण्याकरिता म्हणूनच बंगाली नाटककार ज्योतिरींद्रनाथ टागोर ( रवींद्रनाथ यांचे वडील बंधु) यांच्या 'सरोजिनी' नाटकाचें भाषांतर केलें. यानंतर १९०८ सालीं 'बलिदान' नांवाचें नाटक लिहिण्यास हातीं घेतलें; पण त्याची मजल अेक अंकापलीकडे गेली नाही. हें नाटक लिहिण्यांत, मवाळ व जहाल या पक्षांच्या गुणदोषांची तुलना व वर्णन नाट्यरूपाच्या पर्यायाने करण्याचा माझा विचार होता. म्हणून बौद्ध ( मवाळ ) व शाक्त ( जहाल ) या धर्मांच्या लोकांसंबंधाचें अेक कथानक मी योजिलें होतें; पण तें अर्धवटच राहिलें. मौज ही वाटते की, यानंतर नक्की सहा नाटकें समग्र स्वतंत्र लिहिलीं असतां हें त्रुटित नाटक मात्र पुरें करण्याला मला वेळ मिळाला नाही ! पण पुष्कळ वेळा असेंच कांही होतें. शेवटी १९३६ सालीं या कथानकावर कादंबरी ( बलिदान नांवाची) लिहून मी ती सह्याद्रि मासिकांत प्रसिद्ध केली !
 (६३) आपण नाटक लिहावें व तें रंगभूमीवर यावें अशी माझी स्वाभाविक अिच्छा व मनांतून हौस असतांहि, माझ्या हातून नाटक पुरें लिहून न होण्याचें अेक कारण असें की, प्रयोग करण्याकरिता नाटक स्वीकारणें न स्वीकारणें हें नाटक कंपनीच्या मालकांच्या लहरीवर असतें. आणि तें स्वीकारण्याची लहर यावयाची तर त्या नाटकाने आपणाला खूप पैसे द्यावे अशी त्यांची खात्री पटावी लागते. आता त्यांच्या दृष्टीने यांत वावगें असें कांही नाही. कारण नाटकाचा धंदा जसा अुत्पन्नाचा तसा फार खर्चाचाहि असतो. पण माझें माझ्यापुरतें पाहणें असें की, आपण अिच्छा प्रकट करावी व कंपनीने नाटक नाकारावें, ही गोष्ट अपमानास्पद म्हणून त्या भानगडींत पडूंच नये असें वाटे. अितकेंच नव्हे तर कंपनीने नाटक बसवावें, पण लोकांच्या नव्या अभिरुचीला तें पटूं नये, हेंहि वाअीट वाटण्याचें अेक