पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ त्यांतून निघावा तितका पाला निघत नसे. असो, ही कथा लागवडीची झाली. पण याशिवाय आणखीही दोष त्यामध्ये होते. ते असे:- -- १ किडे पाळण्याचें घर किडे पाळण्याच्या दृष्टीनें अग- दींच निरुपयोगी होतें. २ लागवडींतून मिळणाऱ्या पाल्याचा अंदाज न करता, त्या पाल्यावर जितके किडे पाळले गेले असते, त्याचे दुप- टीनें किडे पाळल्यानें अखेरीस पाला कमती पडला गेला, व सर्व किड्यांची उपासमार झाल्याने पहिलें पीक मातीस मिळालें. ३ घरांतील हवा समशीतोष्ण राखण्याकडे लक्ष दिलें जात नसे. ४ घरांत माश्यांना येण्याला सदर परवानगी असे. ५ काम करणारी माणसें अगदींच अनभ्यस्त असत. ६ सूक्ष्मदर्शक यंत्रानें बीं तपासले जात नसे. ७ लागवडीची योग्य काळजी घेतली जात नसे. ८ कोसले उकळून रेशीम काढणारी मनुष्यें अन- भ्यस्त असत. येणेंप्रमाणे पहिल्या म्यानेजरचे आमदानींत काम चाल- ल्यानें त्या कारखान्याचे मालकास नुकसान आलें. ह्मणून त्याने म्हैसूरकडून रेशमाच्या कारखान्याचा माहितगार असा एक नवीन म्यानेजर आणला. तो मनुष्य फक्त रेशीम उकलण्याचे कामांत सरावलेला असे. शास्त्रीय तऱ्हेने किडे