पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८३ इंजिन व ऑईल इंजिन ठेवण्यास घर, इत्यादि बाबींत त्यांचे जवळ जवळ तीन हजार रुपये खर्च झाले. याप्रमाणें सुर- वार्तासच जमवाजमवत ठरलेले भांडवल संपून गेलें. नवीन ठिकाणी नवीन धंदा सुरू करणाराने होणान्या खर्चा- कडे लक्ष देऊन आवाक्याबाहेर खर्च न होण्याबद्दल दक्षता ठेवली पाहिजे, इकडे चालक व मालक या दोघांचेंही लक्ष नव्हतें. असें ह्यटलें असतां चालेल. अडक्यास जरी हत्ती मि- ळाला, तरी जरूर नसल्यास तो घेऊ नये, हें तत्त्व जमिनीच्या खरेदीच्या बाबतींत त्यांना सोडून पळालें होतें, असें दिसतें. याप्रमाणें मूळ भांडवल वाढतां वाढतां त्याची रक्कम अन- पेक्षित खर्चाने जवळ जवळ अठरा हजार पावेतों चढली. असो; पुढे तरी त्यांनीं खरें पाहिलें असतां ती सर्व जमीन तुतीच्या लागवडीनेंच व्यापावयास पाहिजे, पण फक्त अडीच एकरांतच त्यांनी तुतीची लागण केली. व तीही लागण त्यांनी म्हैसुरी पद्धतीने केली होती. म्हैसुरी अथवा बंगाली लागवड, जेथें एक दोन एकरांवरच कारखाना कर- प्याचा विचार असेल, तेथें केली असतां हरकत नसते. जेथें मूळ उद्देश मोठ्या प्रमाणावर कारखाना करण्याचा असेल, तेथें झाडांच्या लागवडीवरच अवलंबून रहावयाचें असतें. बरें, लागवड जी केली, ती तरी अव्वल जमिनींत करावयाची होती, तीही नाहीं. तर तात्काळीक सपाट केल्या कारणानें ज्या जमिनीवरील पोषकद्रव्यांगभूत माती नाहींशी झाली होती, अशा जमिनींत लागवड केलेली असल्यानें