पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८५ पाळण्यास त्यास येत नसल्यानें त्याचेही आमदानींत नुक- सानच झालें. पुढें मालकानें बंगालमधून एक किडे पाळ- णारा व एक रेशीम उकलणारा, याप्रमाणें दोन मनुष्यें आणून त्यांचे हवाली कारखाना केला. सदर मनुष्ये रेशमाचे किडे पाळण्यांत व रेशीम उकलण्यांत साधारणपणें प्रवीण होती; पण त्या कामाला लागणारी अवश्यक साहित्ये त्यांना न मिळाल्यानें त्यांचे हातून व्हावें तसें काम झालें नाहीं. येणें- प्रमाणे बेळगांवकरांस नुकसान सोसावें लागलें. याप्रमाणेच, ह्मणजे- - १ खर्च केलेल्या भांडवलाचे मानाने लागवडीकडे लक्ष न दिल्यानें; २ किड्यांचा धारेपालट न केल्याने; आणि ३ किडे पाळण्याचें घर शास्त्रीय तत्त्वावर नसल्यानें कै. टाटा शेट यांचे व कोल्हापूर येथील संस्थानचे प्रयत्नांस यावे तसें यश आलें नाहीं. मुक्तिफौजेच्या ताब्यांत बंगलोर- चा कारखाना गेल्यापासून तुतीचे लागवडीकड़े लक्ष दिले जात आहे. पण तेथील म्यानेजर साहेब किडे पाळ- ण्याचे कामांत प्रवीण नसल्यानें यावें तसें यश अद्याप नाहीं. श्रीमंत महाराज, बडोदा, यांनी सुरू केलेल्या कारखान्यांत वर दिल्याप्रमाणेंच चुका आहेत, आणि विशेष हैं, कीं, त्यांचे कारखान्यांत त्यांनी एकही प्रवीण माणूस आणलेला दिसत नाहीं, असें त्यांच्या किडे पाळण्याच्या घरावरून व लाग- वडीवरून सिद्ध होतें. सारांश, रेशमाचे कारखान्यास त्या त्या