Jump to content

पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ सरकारनीं सेरीकल्चरल एक्सपेरिमेंटल फार्म संस्थानच्या शेतकी खात्याला जोडून काढल्याला बरीच वर्षे झाली. पण तेथेंही त्यांस यश आलें नाहीं. ज्या अर्थी इतक्या ठिकाणीं केलेल्या प्रयत्नांस यश आलें नाहीं, त्या अर्थी ह्या धंद्यास त्या त्या ठिकाणची हवा मानवत नाहीं, असेंच ठरलें कीं काय ? याचें उत्तर हें आहे कीं, वरील प्रत्येक ठिकाणची हवा किड्यांस मानवत नाहीं, असें नसून तेथील सगळ्यांच्या प्रयत्नांची दिशाच चुकलेली होती. उदाहरणार्थ, एक बेळगांव येथील कारखाना घेऊन त्याचे चालकांस कां अपयश आलें तें दाखवूं; ह्मणजे, त्यावरून अवांतर ठिकाणचे प्रयत्नांची दिशा कोठें चुकली, तें कळण्यासारखें आहे. एकंदर भांडवल पांच हजार जमवून त्यावर कारखाना काढावयाचें ठरलें होतें. पैकीं जवळ जवळ अडीच हजार रुपयांची अजमासें सोळा एकर जमीन खरेदी झाली. जमि- नीच्या व जमिनींतील घराच्या दृष्टीनें जमीन जरी स्वल्पांत मिळाली होती, तरी रेशमाच्या लागवडीच्या दृष्टीनें ती - जमीन त्यांना अत्यंत महाग पडली, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. कारण, ठरलेल्या भांडवलानुसार त्यांना तितक्या किंम- तीची जमीन घेणें परवडत नव्हतें. पुढें जमिनींत पाण्याकरतां विहीर खोदविली. हें त्यांचे करणें रास्त झाले. पण विहिरीं- तून पाणी उपसण्याकरितां त्यांना पंप व ऑईल इंजिन यांच्या खरेदीची अवश्यकता नव्हती. असे असूनही पंप, ऑईल