पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ पाहिलें, तर अशा उष्णतेच्या उन्हाळ्यांत देखील किडे सहज पाळतां येतात. ज्यांना लहान प्रमाणांत किडे पाळावयाचे असतील, त्यांनीं तेथें अशा अतिशय गरमीचे दिवसांत किडे पाळू नयेत. पाहिजे तर तसेंच अतिशय पाऊस असेल, तेथेंही थोडे दिवस किडे पाळण्याचें काम बंद ठेवीत जावें. जेथें प्रखर उन्हाळा असेल, तेथें उन्हाळ्याचे चार महिने, व जेथें अतिशय पाऊस पडत असेल, तेथे पावसाळ्याचे तीन महिने, किडे पाळावयाचें काम बंद ठेवावें. बाकी अवां- तर आठ नऊ महिने किडे पाळण्याचें काम चालू ठेवावें. आमच्या महाराष्ट्रांत रेशमाचा कारखाना पहिल्याने वेळ- गांवनजीक सुरू करण्यांत आला होता. तेथें त्या प्रयत्नासं यावें तसें यश आलें नाहीं. तीच स्थिति कोल्हापूर संस्थानां- तील कारखान्याची झाली आहे. कित्येक मंडळींनी वाळवे तालुक्यांत, साताऱ्यानजीक, डाहणूनजीक, व मुधोळास प्रयत्न केले आहेत; पण ते पायाशुद्ध. अशा तत्त्वावर झालेले नसल्याने त्यांस यावें तसें यश आलें नाहीं. कै. टाटा शेट यांनी बंगलोर येथें रेशमाचा कारखाना काढलेला आहे, व त्यांत एक जपानी गृहस्थही त्यांनीं काम करण्यास आणला होता. पण खर्चाच्या मानानें त्यांत त्यांना उत्पन्न झालें नाहीं. ह्मणून त्यांनीं तो कारखाना मुक्तिफौजेच्या हवाली केला. हल्लीं मुक्तिफौजेची मंडळी जरी तें काम करीत आहेत, तरी अद्याप पावेतों कारखान्याचा खर्च भागेल इतकें उत्पन्न त्यांस होत नाहीं. बडोद्यास श्रीमंत गायकवाड १६