पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० वाऱ्याबरोबर धूळ घरांत येऊन तद्द्वारें किड्यांस नुकसान होण्याची धास्ती नसते. सारांश, थोड्याशा गैरसोईंबरोबर सोईही बऱ्याच असतात. ही कथा घाटमाथ्यावरील प्रदेशाची झाली. आतां सपाटी- वरील, ह्मणजे जेथें विशेष प्रमाणांत उष्णता असते, अथवा जेथें साधारण कडक उन्हाळा भासतो, अशा ठिकाणीं देखील थोड्याशा कृत्रिम उपायानें बारमहा रेशमाचे किडे व्यापारी दृष्टीने पाळतां येणें शक्य आहे. रेशमाचे किडे जर उघड्यावर पाळावयाचे असते, तर मात्र त्यांना मानवेल असा हवेंत फरक करणें शक्य झालें नसतें. पण किडे घरांत पाळावयाचे असल्याने घरांतील हवा थोड्याशा खर्चानें पाहिजे त्या स्थितीत राखणें कांहीं कठिण नाहीं. व तो होणारा खर्च उत्पन्नाच्या दृष्टीनें पर- वडणार नाहीं, असाही नसतो. घराचें छपर उंच केल्यानें, घरास गवताचेंच छप्पर घातल्यानें, व घर झाडांच्या छायेत बांधल्याने घरांतील हवा निसर्गत:च बाहेरील हवेपेक्षां उन्हाळ्यांत थंड व पावसा - ळ्यांत उष्ण असते. तसेंच जाळ्यांना, खिडक्यांना व दारांना गवताचे पडदे बांधून वर पाणी छाटीत गेल्यास अति प्रखर उष्णतेच्या दिवसांत देखील वरांतील हवा किड्यांस सहज मानवेल अशी राखतां येते. ह्मणजे, आपणांस घरा- तील हवा, हवाभारमापक यंत्रांतील पारा सत्तावन अंशावर राहील, इतकी देखील राखतां येते. सारांश, याही मानानें