श्री हरतालिकेची आरती

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
श्री हरतालिकेची आरती

जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते ।
ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी।
आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने ।
धुम्रपाने अघोवदने ।
केली बहु उपोषणे ॥
शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण ।
चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥



PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५२ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg