श्री जगदंबेची आरती
| ←= | श्री जगदंबेची आरती |
==आरती 1==
जय देवी जगदंबे ।
संकट देवा पडले ॥
इंद्रादि निर्जर जय जय वाणी ।
तुज स्तविती बद्धपाणी ॥ धृ. ॥
शुंभनिशुंभासाठी ।
सुर रिघती तव पाठी ।
प्रकट हिमाचळी होऊनि बाळा ॥
दैत्यदुष्टा मोहुनी सकळां ॥ जय. १ ॥
पहातसे दैत्यराणा ।
स्वरूपाची करी तुळणां ।
मोहित झाला खळ तव काये ॥
नच जाणोनि आदिमाये ॥ जय. ॥ २ ॥
दैत्यांचे सैन्य सारें ।
जाळूनियां हुंकारे ।
वीरा करुनी खंडविखंड ॥
प्रथम वधिलें चंडमुंड ॥ जय. ॥ ३ ॥
जन असुरी बहु पिडिले ।
रूप भयंकार धरिले ।
मग बळि महिषासुर खल वधिला ॥
तिन्ही लोकीं हर्ष झाला ॥ जय. ॥ ४ ॥
दैत्यवरें मत्त झाले ।
सुरशुत्रू निर्दळिले ।
ज्यांची त्याला स्थानें दिधलीं ॥
निर्दैत्य भूमि केली ॥ जय. ॥ ५ ॥
==आरती 2==
निजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे ||धृ.||
अंबे जगदोद्धारिणि गे |
श्री महालक्ष्मी प्रणवरूपिणी,
मधुकैटभ-महिषासुरमर्दिनी
शुंभ-निशुंभासुरअसुवाहिनी
चित्सुखदायिनि गे ,अंबे चित्सुखदायिनि गे ||१||
स्वरूप लक्ष्यालक्ष्यधारि गे
उत्पत्ती-स्थिति-लयाकारिके
अनंत कोटि ब्रह्मांडनायिके
भवभयनाशिनि गे ,अंबे भवभयनाशिनि गे ||२||
हर्षे वासुदेव तुझिया पायी
निजशरणागत होउनि राही
नाम मुखी, हृदयि कीर्ति ध्यायी
पतीतपावनि गे अंबे पतीतपावनि गे ||३||
निजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे
अंबे जगदोद्धारिणि गे ||
||जगदंब नारायणी उदयो$स्तु||
| हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५२ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |