पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत अमि ते संगी अलिस ॥ ८८ ॥ काष्ठमथने अग्नि प्रकटला । त्या नांव ह्मणती उपर्जला । काष्ठाकारी आकारला । लहान थोर जाला तद्योगें ॥ ८९ ॥ अग्नि काष्ठविकारवशे । त्रिकोण वर्तुळ वक्र आभासे । काष्ठाचेनि निःशेष नागें । नाशला ऐसे मानिती ॥२९॥ तैसा अज नित्य अव्ययो । त्यासी आकार-विकार-जन्म-लयो । हा देहादिसबंधस्वभावो। मिथ्या पहा हो मानिती ॥ ९१॥ जें साधिले अग्निदृष्टांतें । तें उद्धवासी नै मैनेल चित्तें। यालागी निरूपण मागुतें । श्रीअनंते मांडिले ॥ ९२ ॥ उद्धवा तूं ऐसे ह्मणसी । मूळी सिद्धसंयोगू अग्निकाष्ठांसी । तो काठधर्मु लागला अग्नीसी । हे आझांसी मानले ॥ ९३ ॥ आत्मा नित्यशुद्ध अविकारी स्वांगें । जो गगनासी नातळे अंगें । त्यासी देहसंगू -केवी लागे । मग तद्योगें विकारी || ९४ ॥ आत्म्यासी देहसंगु घडे । हे बोलणेंचि तंव कुडें । ऐसें न घडतेंही जरी घडे । तरी तो सांपडे देहबुद्धी ॥ ९५ ॥ जो देहबुद्धीमाजी आला। तो केवळ देहधारी जाला । पुढें केवी जाय त्यागू केला । ऐसा उपजला सदेहो ॥ ९६ ।। कृष्ण ह्मणे उद्भवासी । ऐसी शंका झणे धरिसी । मन घालोनि मनाचे मानसीं । या अर्थासी परियेसी ॥ ९७ ॥ हे शब्दचातुर्यासाठीं । हाता न ये गा जगजेठी । हे माझ्या गुप्ताचीही गुप्त गोठी । तुजसाठी बोलतों ॥ ९८॥ ___ योऽसौ गुणैर्विरचित्तो देहोऽय पुरषस्य हि । ससारस्तजिवन्धोऽय पुसोऽविद्याञ्चिदारमन ॥ १० ॥ ऐक पुरुप जो पुरुषोत्तम । ज्या आधीन मायागुणग्राम । ज्यासी ईश्वरू ऐसा नामधर्म । शास्त्रानुक्रम बोलती ॥ ९९ ॥ त्या ईश्वराची जे माया । ज्या उपजविले नाना कार्यो । जीव ससारी करावया । भ्रमू वायां वाढविला ॥ ३००॥ तेथे चैतन्य में प्रतिबिंबले । तेंचि जीवपणे वाच्य झाले । जेवी थिल्लरी चंद्रविव बुडाले । दिसे नौथिले मूर्खासी ॥१॥ त्या थिल्लरासी नातळत । चंद्रमा असे गगनी अलिप्त । तैमा आत्मा अविद्यातीत । अविद्या नातळत प्रतिक्विाला ॥२॥ अहमिति प्रथमाध्यासें । सूक्ष्म लिंगदेह मायावशे । नाना अनर्थ करी कैसे । वासनासौरसे उपजले ॥ ३ ॥ जरी लिंगदेह जालें सवळ | विषयभोगा दृढ मूळ । तरी भोगू नव्हे स्थूळ । सूक्ष्म भूतगोळ स्थूळावला ॥४॥ स्थूळापासोनि स्थूळ देहो । पांचभौतिक घडला पहा हो । एवं उभयदेहअभिप्रायो । जाला "निर्वाहो या रीती ॥ ५॥ ऐसा उभय देहीं वर्ततां । दृढ लागली देहात्मता । तेणे वाढली अहंममता । मी कोण हे तत्त्वता विसरला ॥ ६॥न कळे निजसुखाची गोडी । पडला विषयाचिये 'वोढी । पापपुण्याचिया जोडी कोडी । पडिली वेडी मुंबद्धा ॥७॥ देहाध्यासे देहधर्म । सत्य मानी वर्णाश्रम । मग आचरों लागे कर्म । फळसभ्रम वांछूनी ॥ ८॥ राजा चक्रवर्ती निजमदिरी । निजेला सुमनशेजेवरी । तो स्वमी होऊनि भिकारी । अत्यजाघरी अन्न मागे ॥९॥ तेय कुटका एकु यावया हाता। नीचासी ह्मणे राजा रे तूं तत्त्वतां । परी मी राजा हे नाठवे चित्ता । स्वमी भिक्षुकता दृढ झाली ॥ ३१० ॥ तैसी विसरोनि निजात्मता । फळे मागे । १ उत्पन्न झाला ५ आकारास, रूपास आला ३ पटणार नाही ४ नित्यसिद्ध ५ सर्शत नाही सोट, थाईट ७ कदाचित् ८ दान्दचातुर्य असल्याने ९ मायेचे सबळ गुण ५० देश्वरीतत्व ११ उपक्यात १२ टिफ, गोर्ट, १३ 'मी' याच्या १४ अभ्यास झणजे तादात्म्य, आपल जे रूप नन्हे ते आपलेच भाहे अशी १८ भावना. १५ वामनेच्या आसीमुळे १६ व्यवस्था १७ भीपणा व माक्षेपणा १८ प्रवाहात १९ कोटी २० अज्ञाग्याला, २१ पुष्पाच्या गय्येवर ०२ तुरडा