L६८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय 32 मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥ बाजी परभू भ्याला नाही दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥ हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥ चातुर्याने लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥ फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्ला माचीस दुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥ हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीले फार मोगलास ॥ मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धिस । काबीज केलें माचीस ॥ यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥ हेटकऱ्यांचा थाट नीट मारी लुटायास । मोगल हटले नेटास ॥ बाजी मावळ्यां जमवी हाती घेई खांड्यास । भिडून मारी मोगलास ॥ मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले ऊंद्रास ॥ लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥
पान:Samagra Phule.pdf/१०९
Appearance