Jump to content

पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून सांगू लागले. पाय धरून जीव वाचविण्यासाठी विनवू लागले. क्षणभर काय झाले हे कुणाला समजेचना. दुपारी भारतीय फौजा तिरंगी ध्वजासह त्या खेड्यात आल्या आणि लोकांच्या आनंदाला अनावर उधाण आले. आजवर भोगलेल्या अत्याचारांची प्रतिक्रिया सुरू झाली. गावातील लोक मोठेपण, प्रतिष्ठा आणि वय विसरून रस्त्यावर निजामाच्या नावे बोंब मारू लागले व होळीप्रमाणे रस्त्यावर नाचू लागले.

***

(प्रकाशन : ‘सुगंध' दिवाळी अंक १९७२)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८१