Jump to content

पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२३
ऐतिहासिक काल.

 अर्वाचीन दोन हजार वर्षांचा जो काल त्याचा यांत समावेश होता. ह्या कालाचे तीन भाग करितां येतील. पहिला, हिंदु राज्यांचा काल सन १००० पर्यंतचा; दुसरा, मुसलमानांचे राज्याचा सन १७५७ चे प्लासीचे लढाईपर्यंतचा; व तिसरा, त्या नंतरचा इंग्रजांचे राज्याचा. ह्या कालामध्येसुद्धा जंगलाचा उत्तरोत्तर ऱ्हासच होत गेला असावा. तो अलीकडे ३०|४० वर्षांपूर्वी मात्र थांबला.

 हिंदुराजांचे कारकीर्दीत जंगलची व्याप्ति किती होती, हे सांगण्यास साधन नाहीं. ख्रिस्ती शकाचे चौथ्या शकामध्ये फाहिमान नांवाचा एक चिनी प्रवासी हिंदुस्तानांत आला होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन लिहून ठेविले आहे. त्यांत तो म्हणतो की, हिंदुस्तान देशाची हवा फार थंडही नाहीं व उष्णही नाहीं. ह्यावरून ह्या वेळेच्या पूर्वी दोन तीन शतकें व नंतर दोन तीन शतकें तरी देशामध्ये जंगलची समृद्धि चांगली असावी असे अनुमान काढिता येईल. शिकारीकरितां राने राखून ठेवण्याची पद्धत चालू असे असे दिसते.

 मुसलमानांचे अमदानींतही जंगलची व्याप्ति किती होती, हें समजण्यास मार्ग नाहीं. परंतु, शिकारीकरितां व डोंगरी किल्ल्यांचे पायथ्याशी त्यांच्या संरक्षणाकरितां जंगले मुद्दाम राखून ठेवीत असत. हीं राने राखून ठेवण्याचे नियमही कडक असून त्यांचा अंमलही सक्तीने होत असे. परंतु रानसंरक्षणापासून फायदे काय