पान:समता (Samata).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महिला पोलीसांचा सहाय्यता कक्ष महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्णय क्र. एपीओ ३६०५/३ (ए) दि. १७/२/२००६ नुसार महिलांसाठी स्वतंत्र सहाय्यता कक्ष स्थापन करण्याला मंजूरी मिळाली. | पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ८ मार्च २००८ रोजी पीडित महिलांच्या मदतीसाठी एक स्वतंत्र सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षात प्रशिक्षित समुपदेशक, समाजसेवेचे प्रशिक्षण घेतलेले तज्ञ, वकील मानसोपचार तज्ज्ञ आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पीडित महिलांच्या तक्रारींची नोंद घेऊन हा कक्ष महिलांना योग्य ते समुपदेशन आणि मदत करुन त्यांची समस्या सोडवण्यात तसेच कौटुंबिक समस्या सोडवण्यात सहाय्य करते आहे सध्या पुणे पोलीस आयुक्तालयातील कक्षात १८ समुपदेशक असून त्यांच्या तर्फे आठवड्या तील तीन दिवस काम चालते. | « या कक्षाची सर्वसाधारण उद्दिष्टये पुढील प्रमाणे आहेत. १. पीडित महिलेला महिला दक्षता समितीच्या सदस्यांशी संवाद साधण्यास मदत करणे त्याची समस्या ऐकून घेणे आणि त्यांचे समुपदेशन करणे. महिला दक्षता समितीच्या पातळीवर समस्या सुटली नाही तर पोलीस चौकीत लेखी तक्रार करण्यास मदत करणे. जरुर पडल्यास पीडित महिलेची निवासाची सोय करणे. शाळा, महाविद्यालयाचे, झोपडपट्टी अशा ठिकाणी मेळावे-बैठका घेऊन महिलांविषयी कायद्यांची माहिती देणे, महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करुन देणे. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी संबंधीत समितीच्या बैठका घेणे. m

लेक लाडकी अभियान शिरुर (का) (३४)