Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेतलं जात नाही. त्यांना वेगळे वागविले जाते. त्यांच्या आई वडीलांवर त्यामुळे त्यांची खूप जबाबदारी पडते. 515 सामाजिक भिन्नताओं को समझना जरूरी या सारख्या भिन्नता आपण समजून घेतल्या पाहीजेत. त्यावर आधारीत असमानता चुकीची आहे. अन्यायकारक आहे. या अत्याचाराच्या विरुद्ध झगडले पाहिजे. ही असमानता दूर करण्यासाठी सरकारने कायदे केले आहेत. परंतू ते पाळले जात नाहीत. आपलं कर्तव्य आहे की आपल्या समाजातील ही असमानता दूर केली पाहीजे.सर्वांना त्यांचे अधिकार मिळाले पाहीजेत. श्रीमंत आणि ब्राम्हणी विचार असणा-या लोकांना समजून घ्यावे लागेल की अन्याय आणि टोकाची असमानता समाजासाठी हीताची नाही. अन्याय आणि असमानतेमुळे ताण-तणाव आणि दंगली होवू शकतात. हे सर्व सुरु राहील्यामुळे फक्त गरीब व दलितच नव्हे तर त्यामुळे श्रीमंत आणि ताकदवान वर्गाचेही नुकसानच होत असते. म्हणून विषमता दूर करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील.