Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीमंत आणि गरीब युवकः दोन वेगळ्या दुनिया भारतीय राज्य घटना सर्वांना समतेचा अधिकार देते परंतू सत्य पूर्णपणे वेगळे आहे. श्रीमंत घरातील मुले चांगल्या शाळेत शिकतात त्यांना सर्व सोयी सुविधा प्राप्त करुन दिली जातात. घरात नोकर चाकर त्यांची कामे करतात, त्यांच्याकडे खुप सारी खेळणी असतात. त्यांच्याकडे मोबाईल, कॉम्प्युटर गेम असतात, बॅण्डेड कपडे असतात, सर्व प्रकारचे संगीत ते ऐकू शक तात, ते मागतील ती गोष्ट त्यांना मिळत असते.गरीब मुलांची परिस्थिती आणि त्यांचा अनुभव बिलकुल उलटे आहेत. गरीब, दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबातील मुलांना शाळेतही जाता येत नाही. घर खर्च चालविण्यासाठी त्याला काम करावे लागते. त्यांना बाल मजूरी म्हटले जाते.रस्त्यावर वस्तु विकणे, आपल्या कुटुंबासोबत किंवा एकट्याने काम करावे लागते, कामाच्या शोधात शहरात जावे लागते. लोकांच्या घरात सकाळपासुन संध्याकाळ पर्यंत त्यांना काम करावे लागते. झोपडपट्टी किंवा रस्त्यावर रहावे लागते. टीव्ही वर किंवा रसत्यावर वस्तूंच्या जाहिराती ते पहातात. परंतू त्या पैकी महागडी एकही वस्तू ते घेऊ शकत नाही. या गरीब मुलांना त्यांच्या बालपणाला मुकावं लागते आणि सर्व प्रकारची जबाबदारी स्विकारावी लागते.