पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे सगळं परिवर्तन प्राकृतिक आणि स्वाभाविक आहे. यात काही घाण आणि वाईट नाही. या सगळ्याची भिती किंवा गुन्हा वाटण्याची गरज नाही. हे सगळे बदल नीटपणे आणि समजून घेवून स्विकारले पाहीजेत. जरा काळजीपूर्वक मुलां-मुलींमधला, स्त्रि-पुरुषांमधला एक खास आणि वेगळा बदल आहे. तो समजुन घेतला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळे बदल प्रजनन व्यवस्थेशी संबंधीत आहेत. जसे योनी आणि लिंग, मुलींमध्ये गर्भाशय, अंडकोश आणि स्तन असतात.मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि मुलींमध्ये एस्ट्रोजन हार्मोन हे बदल घडवितात. या व्यतिरिक्त मुलां-मुलीमध्ये किंवा स्त्रिपुरुषांमध्ये फरक नाही, दोघेही एक सारखे आहेत. दोघांनाही दोन कान, एक नाक, दोन डोळे इ. आहेत. म्हणजेच निसर्गाने फक्त प्रजननासाठी स्त्रि-पुरूषांमध्ये हा बदल केला आहे. प्रजनना शिवाय जे पुरूष करू शकतात ते स्त्रिया पण करू शकतात. जी कामे स्त्रिया करु शकतात ती कामे पुरूष देखील करू शकतात. हे निर्सगाचे सत्य आहे की पुरूषांना मुलं निर्माण करण्याची शक्ती दिलेली नाही.परंतु मुले वाढविण्यामध्ये , मुलांना प्रेम देण्यामध्ये पुरुष महत्वाची भूमिका करू _ 57