पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. आपले स्वसाक्षीदार बना - | आपण स्वत:कडे त्रयस्थपणे कधीच पाहत नाही, नेहमी आपण समोरच्याकडे बोटे दाखवितो. स्वतःकडे बघण्याचा अर्थ आपल्या भावना व विचारांचे आत्मपरिक्षण करणे, स्वतःकडे दुरुन बघणे. आपल्या विचारांचे आणि भावनांचे विश्लेषण व परिक्षण करा. ही पद्धत दुनियेला गौतम बुद्धांनी शिकवली.आपण आपल्या भावनांमध्ये गढून जातो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपले सगळे अस्तीत्व रागात बुडते. राग आपल् या वर हावी होतो.राग जे हवे ते आपणाकडून करून घेतो. प्रेम, ईर्षा, उदासी, घृणा या भावना ही आपल्यावर हावी होतात. भावनांच्या आपण आहारी जातो आणि बेकाबू होवुन जातो. आपलं नियंत्रण हरवून बसतो. गौतम बुद्ध म्हणाले, जेव्हा नियंत्रण हरवून बसतात त्याच क्षणी त्याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असते. कसे तर आपले विचार आणि आपले मनोविकार याकडे त्रयस्थपणे पाहता आलं पाहिजे.