Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्या भावनांना विचारा काय चालले आहे? आणि मग विचारा आता काय करुया याचं, कसं वागूया? आपल्या बालपणीच्या संस्कार आणि अनुभवामुळे आपल्या भावनांवर परिणाम होत असतो. जर बालपण आनंदी कुटुंबात, प्रेमाने, चांगल्या नात्यामध्ये व्यतीत झाले असेल तर अशा व्यक्तींचा भावनिक समतोल चांगला राहतो. पण जर लहानपणी हिंसा पाहिली असेल, प्रेम मिळालं नसेल तर मग राग, हिंसा, घृणा, भीती अशा भावना उत्पन्न होतात. पण एक गोष्ट चांगली आहे की या भावनांसमोर आपण लाचार नाही. आपण आपल्या भावनांना समजून उमजून नियंत्रणात ठेवू शकतो, बदलू शकतो, रिप्रोग्राम करु शकतो. आपण आपल्या भावनांचे, चूकींचे, वर्तनाचे गुलाम नाही. तणाव, दबाव, राग, हिंसा या सगळ्या भावनांवर आपण नियंत्रण करु शकतो. हळू हळू त्यांना समजून घेऊन आपण आपलं वर्तन नीट करु शकतो. स्त्यिात किया जा सके ? हिस> भावनांमध्ये वाहून जाण्याचं कारण नाही. त्यामुळे आपले चूकीचे वर्तन रोखता येईल, हे कौशल्य आहे. ते शिकावं लागेल. हां, कधी कधी भावना आपला कब्जा घेतात. रागात आपण सर्व विसरुन जातो.