Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक खोटे, बेगडी जीवन त्यांना जगावे लागते.जिथे लोकशाही आहे, मानवाधिकाराची आंदोलने सशक्त आहेत.तेथे लैंगिक स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरु आहे.लोकशाही आंदोलनानतंर शेजारील नेपाळ सारख्या देशातील समलिंगी संबंधांना मान्यता देण्यात आली आहे. आफ्रिकेत ही कायदयाने समलैंगिकता स्विकारलेली आहे. समलैंगिकता अपराध नहीं है। लिंग आणि लैंगिकतेवर समाजाचा खडा पहारा | काही समाजात लिंग आणि लैंगिकतेवर खुप बंधने घातली आहेत. कोणी कोणाबरोबर, कधी ,कोठे लैंगिक संबंध करु शकतात, कोण कोणाबरोबर कधी लग्न करु शकतो. आजही लैंगिक संबंधाच्या कारणावरुन तरुणांना बहिष्कृत करणे, त्यांना मारुन टाकणे असे प्रकार होतात. लैंगिकतेवर समाज इतके नियंत्रण एवढया साठीच ठेवतो कारण लैंगिकते चे परिणाम जीवनावर खुप खोलवर होवु शकतात.मुलींना गर्भधारणा होवु शकते, लग्नाचे वय नाही, स्वतः पायावर उभे नाहीत, मुलीची प्रकृती बिघडु शकते. तिच्या संपुर्ण जीवनावर परिणाम होवु शकतो. 124