पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यामुळेच माणसांचे शोषण होते.त्यांच्या जीवनात निर्भत्सना, हिंसा आणि दुख येते. समाजाच्या दृष्टीकोनामुळे (शारिरिक किंवा नैसर्गिक कारणामुळे नव्हे) मुले आणि मुली लैंगिकतेबाबत वेगळया पध्दतीने विचार आणि व्यवहार करतात. मुलांना याच्याबाबतीतले जास्त स्वातंत्र्य मिळते. त्यांच्या लैंगिकतेवर नियंत्रण नसते ते लैंगिकतेत जास्त रस घेतात,अधिक सक्रीय असतात. काही मुले लैंगिकतेत आक्रमक असतात. मुलींची छेड काढतात,जबरदस्तीने स्पर्श करतात, बलात्कारा पर्यंत त्यांची मजल जाते. सामाजीक दबाव आणि गर्भधारणेच्या भितीने मुली लैंगीकते पासुन दुर राहण्याचा प्रयत्न करतात आणि पुढाकारही घेत नाहीत. परंतु कुटुंब नियोजनाची साधने आल्यापासुन मुली आणि महीलांना लैगिक स्वातंत्र्य मिळणे शक्य झाले आहे.लैंगिक स्वातंत्र्याचे दिशेने पावले पडत आहेत. लैंगिक आवड भिन्न असु शकते सामान्यतः लोकांना भिन्न लिंगी आकर्षण असते. भिन्न लिंगाच्या व्यक्तीबरोबर नाते तयार होते म्हणजे स्त्री-पुरुषा मधील नाते यालाच विषम लैंगिकता म्हटले आहे. विषम लैंगिकता 122