पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

k0 गर्भलिंग निदान म्हणजे काय हे माहीती आहे? अलिकडे जोडपी सोनोग्राफी करुन मुलगा आहे का मुलगी, तपासतात आणि मुलगी असेल तर तो गर्भ काढून टाकला जातो. या दृष्कृत्यात कुटुंब, डॉक्टर, मशिन बनविणारे , विकणारे सर्वच गुंतलेले आहेत. या सा-याचा परिणाम म्हणून मुलींची संख्या कमी झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १००० मुलांमध्ये ९१९ मुलीच जन्माला आल्या. पंजाब ८५४ तर हरीयाणात ८४२ एवढी संख्या १००० मुलांमध्ये कमी झाली आहे. या विरुद्ध कायदा बनविण्यात आला असून म्हणावा तसा फरक अजून पडलेला नाही. | आमचे म्हणणे आहे की, मुलगा, मुलगी, स्त्री-पुरुष यांच्यात बरोबरीचे आणि एकमेकांचा आदर करणारे नाते असले पाहीजे. तरच परीवार आणि समाज सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकेल. एकमेकांसोबत चांगले आणि संपन्न नाते निर्माण झाले पाहीजे. लैगिक नात्यामध्ये देखील आनंद ,सौंदर्य आणि बरोबरीचे नाते असले पाहीजे. जर मुली मुक्त, मोकळया वातावरणात वाढल्या नाहीत , फुलल्या नाहीत, खुलल्या नाहीत तर मग समाज आणि परीवार कसे फुलतील ? आनंदी होतील? त्यांची स्वप्ने खुडून हे कसे शक्य होईल ? तु खुद को समझ, तु खुदको बदल, तब ही तो जमाना बदलेगा, 102_