________________
५० संतवचनामृत : ज्ञानदेव. [६८४ ८४. जाग्रत्, स्वप्न, सुषुप्तीत उन्मनीतल्याप्रमाणेच साक्षात्कार. जागृति पुसे साजणी । कवण बोलिलें अंगणीं। निरखितां वो नयनीं । वृंदावनी देखियेला ॥ मानि वेधु तयाचा । पंढरिरायाचा ।। ध्रु.॥ स्वप्न सांगे सुषुप्ति । असे ममता हे चित्तीं। विठ्ठल होईल प्रतीति । मग गर्जती तुयें । मज बोलों नये ऐसे केले । मन उन्मनी बोधलें। बाप रखुमादेवीवर विठ्ठले । थिते नेले मी माझे ॥ ८५. निरंजनवेषांत अर्धनारीपुरुषाचे दर्शन. औटपीठावरी निरंजन देश । तेथ मी जगदीश असे बाई ॥ त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारा । अर्धमात्रेवरावरी गेलों ॥ अर्धनारीपुरुष एकरूप दिसे । सर्वत्री संचले शून्य एक ॥ . ८६. जेथें नारीपुरुष एकरूपाने दिसतात तेथे देखणे पारुषतें. निशीदिवस दोघे लोपले ते ठायीं । निरंजन ते ठायीं लक्षुनी पहा ।। रविशशि ज्याचे तेजे प्रकाशले। नवल म्यां देखिले एक तेथें ॥ नारीपुरुष दोघे एकरूपें दिसती । देखणे पारुखे तया ठायीं ॥ शानदेव म्हणे शिव तेचि शक्ति । पाहातां व्यक्ती व्यक्त नाहीं ॥ . ८७. ज्ञानदेवांस विश्वरूपाचे दर्शन... विश्वरूप पाहे तंव सभोवतें रूपडे । पाहे चहूंकडे तेंचि दिसे ॥ काय करूं संये कैसा हा देव । माझा मज भाव एकतत्त्वीं॥ - १ गडे, २ स्थिर अससेलें. ३ खुंटणे, नाहीसे होणे. ४ गडे.