Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६७३ ७३ अनुपम्य तेजानें ब्रह्मांड धवळून जाते. अनुपम्य तेजें धवळले ब्रह्मांड । विश्वरूपी अखंड तदाकार ॥ रसी रस मुरे प्रेमाचे स्फुदन । एकरूपी धन हरि माझा ॥ नाद आणि ज्योति परिपूर्ण आत्मा । परोसि महात्मा उजेडला ॥ झाला अरुणोदयो उजळले सूर्यतेज । त्याहूनि सतेज तेज आले ॥ हारपल्या रश्मि देहभाव हरि । सिद्धि बुद्धि कामारी जाल्या कैशा॥ निवृत्तिउपदेश शानियां लाधला। तत्त्वी तत्त्व बोलला ज्ञानदेव ॥ ७४. अनाहतनादानें योगी आपल्या ध्येयास जातो. नासिकेचा प्राण कोणे मार्गी येत । नाद दुमदुमित अनुहाती॥ इंडे पिंगळेचा ओघ सैरां दिसे । त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥ शानदेव म्हणे अष्टांगयोगिया । साधितो उपाया याचि मार्गे॥ ७५. साधु आपलें अंतकाळचे लक्षण कसे ओळखतो ? कानी घालूनियां बोटे नाद जे पहावे। न दिसतांजाणावेंनऊ दिवस॥ भोवया पहातां न दिसे जाणा । आयुष्याची गणना सात दिवस ॥ डोळांघालोनियां बोट चक्र जे पहावान दिसतांजाणावें पांच दिवस नासाग्राचे अन न दिसे नयनी । तरि तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥ ज्ञानदेव म्हणे हे साधुचे लक्षण । अंतकाळी आपण पहा वेगीं। १ दाट, पूर्ण भरलेला. २ दासी. ३-४ डावी व उजवी नाडी.