Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६३१ हर्षे ब्रह्मांड उतटे । समूळ उठे मीपण ॥ या संतांसि भेटतां । हरे संसाराची व्यथा। पुढती पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥ या संतांचे देणे । कल्पतरूहूनि दुणे । परिसापरिस अगाध देणे । चिंतामणि ठेंगणा ॥ या संतांपरिस उदार । त्रिभुवनीं नाहीं थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोयरे ॥ कृपाकटाक्षे न्याहाळिलें । आपुल्या पदी बसविलें। बाप रखुमादेवीवर विठ्ठले । भक्तां दिधले वरदान ॥ ३२. व्यासांच्या खुणेनें ज्ञानदेव सांगतात की भक्तांचे घरी देव आहे. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ असोनि संसारौं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ शानदेव म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥ ३३. आज संतांच्या भेटीमुळे मनांत परमानंदाचा उदय झाला आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली। ती मज आजि फळासि आली ॥ परमानंदु आजि मानसीं। भेटी जाली या संतांसी ॥ मायबाप बंधु सखे सोयरे । यांते भेटावया मन न धरे॥ एक एका तीर्थीहुनि आगळे । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥ निर्धनासि धनलाभ जाला । जैसा अचेतनी प्राण प्रगटला ॥ १ भरून वाहणे. २ दुप्पट. ३ पेक्षां. ४ हात. ५ खुणेनें.