Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [$ १४ ४. नामाचे महत्त्व. १४. विठोबा, नाम तुझे सार. सार सार सार विठोबा नाम तुझे सार । म्हणोनि शूळपाणि जपताहे वारंवार ॥ आदि मध्यअंती निजबीज ओंकार। ध्रुवप्रल्हादअंबऋषी मानिला निर्धार ॥ भुक्ति मुक्ति सुखदायक साचार । पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥ दिवसेंदिवस व्यर्थ जात संसार। बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाचा आधार ॥ बाप रखुमारा १५. नाम हे गगनाहून वाड आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयांजवळी ॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥ हरिवीण जन्म तो नर्कची पैंजाणा। यमाचा पाहुणा प्राणी होय॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वार्ड नाम आहे ॥ १६. भगवंतांमध्ये जाणीव नेणीव काही नसून केवळ _नामोच्चारानेच मोक्ष मिळतो. जाणीव नेणीवे भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कळिकाळाचा रीर्घ नाहीं॥ १ शंकर. २ इच्छा. ३ मोठे. ४ ज्ञान. ५ अज्ञान. ६ प्रवेश.