Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६११ गुरु हा साधकासी साह्य । गुरु हा भक्तालागी माय। गुरु हा कामधेनु गाय । भक्ताघरी दुभतसे ॥ गुरु हा घाली ज्ञानांजन । गुरु हा दाखवी निजधन । गुरु हा सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ॥ गुरु हा भक्तीचे मंडण । गुरु हा दुष्टांचे दंडण । गुरु हा पापाचे खंडण । नानापरी वारितसे ॥ कायाकाशी गुरुउपदेशी। तारकमंत्र दिला आम्हांसी। बाप रखुमादेवीवरासी । ध्यान मानसी लागले॥ १३. मदालसैचा पुत्रास गुरूपदेश. श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा। मनादि मूळ तूंचि विश्वव्यापका बीजा। समाधी येई पुत्रा स्वानंदाचिया भोजा। पालखीं पहुडैलिया नाशिवंत रे माया ॥ जागरे पुत्रराया जाई श्रीगुरु शरण । देह तूं व्यापिलासी चुकवीं जन्ममरण । गर्भवासु वोखटा रे तेथे दुःख दारुण । सावध होई कां रे गुरुपुत्र तूं सुजाण ॥ मदालसा म्हणे पुत्रा ऐक बोलणे माझे। चौयांशी घरांमाजीं मन व्याकुळ तुझे । बहुत शिणतोसी पाहतां या विषयासी। जाण हे स्वप्नरूप येथे नाही वा दुजे ॥ सांडिरे सांडि बाळा सांडि संसारछंदु । माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु । १ तारणारा. २ उपभोग, अनुभव. ३ निजणे. ४ वाईट, ५ शहाणा.