Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : ज्ञानदेव. [६८ अरे मना रे अरे मना रे न संडी हरिचरणकमळा रे ॥ध्रु०॥ ... स्वप्नींचे धन तें धन नव्हे । मृगजळीचे जळ ते जळचि नव्हे। अभ्रींची छाया ते साउली नव्हे। ऐसे जाणोनियां वेर्गी धरिजेसु आपुली सोय रे रया ॥ तूं जयाचा तेथोनि जिवे जितासी । त्या श्रीहरीते रेनोळखिसी। बाप रखुमादेवीवरा विठ्ठला चिंतिसी। तेणे पावसी तूं सुखाचिया राशी रया ॥ ९, मन अनिवार असल्याने गुरूस शरण जाण्याची आवश्यकता. अरे मना तूं पापिष्ठा । किती हिंडसी रे तूं नष्टा । सैरा शिणसी रे फुकटा । विठ्ठली विनटा स्थिर होई ॥ तूं अनिवार नावरसी। तुझेनि संगे नाडले ऋषी। तूं तंव अपवंशी पाडिशी । म्हणोनि गेले गुरुसी शरण || न सोडी हरिचरण । नाहीं नाहीं जन्ममरण । अविटी सेवी नारायण । तेणे मीतूंपण एकसिद्ध ॥ ज्ञानदेव शरण हरी। मन हिंडे चराचरी । न सोडी चरण अभ्यंतरी । नित्य श्रीहरी हृदयीं वसो॥ ३. गुरूची आवश्यकता. १०. गुरूवांचून अनुभव कसा प्राप्त होईल ? योगयागविधि येणे नव्हे सिद्धि । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥ भावेवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ १ सुशोभित, चांगला. २ वाटरहित, कंटाळारहित.