Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. व एकनाथ यांनी फार उत्तम सांगड घालून दिली. जनार्दनस्वामसिं एका यवन बादशहाने देवगडचा किल्लेदार नमिले होते. हे शके १४९७ मध्ये समाधिस्थ झाले, व त्यांची समाधि देवगडावर एका गुहेत अद्यापिही दाखविली जाते. २२. या जनार्दनस्वामीचे पट्टशिष्य एकनाथ यांचा जन्म केव्हां झाला याबद्दल "दोन मते आहेत. रा. भावे व सहस्रबुद्धे यांच्या मते एकनाथांचा जन्म शके १४७० "मध्ये झाला; व रा. पांगारकर यांच्या मते शके १४५५ मध्ये झाला. एकनाथांच्या समाधीचें साल मात्र शके १५२१ हे जवळ जवळ निश्चितच आहे. एकनाथ हे भानुदासाचे पणतु होत. त्यांची मातापितरे त्यांच्या लहानपणीच निवर्तली. त्यामुळे त्यांचे आजे चक्रपाणि यांनीच त्यांचे संरक्षण केले. हे वारा वर्षांचे असतांना पैठणांत गांवाबाहेरील शिवालयांत त्यांस असा दृष्टांत झाला की “जनार्दन• पंत या नांवाचे साधु देवगडावर आहेत; तेथे जाऊन तूं त्यांचा उपदेश घे" असा दृष्टांत झाल्याने आपल्या आजाचीही अनुज्ञा न घेतां एकनाथ जनार्दनस्वामीकडे • गेले. तेथे त्यांनी आपल्या गुरूची उत्तम सेवा केली, व ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचा उत्तम अभ्यास केला. देवगडाच्या मागे एका डोंगरावर जाऊन सहा वर्षेपर्यंत त्यांनी तपश्चर्या केली. एकदा देवगडावर परचक्र आले असतां जनार्दन - स्वामी ध्यानात गुंतले आहेत असे पाहून एकनाथांनी स्वतः घोड्यावर स्वार होऊन त्या परचक्राचा पाडाव केला. सहा वर्षे गुरूजवळ अध्ययन व तपश्चर्या केल्यावर गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी पैठणास येऊन विजापुरच्या गिरिजाबाई या नांवाच्या मुलीशी लग्न केलें, परमार्थ व प्रपंच मिळून चालविण्याची त्यांची हातोटी कार विलक्षण होती. आपल्या वर्तणुकीने त्यांनी सर्व जगास परमार्थी मनुष्याने प्रपंचांत कसे वागावे याबद्दल उत्कृष्ट कित्ता घालून दिला. आपल्या अंगावर थुकणाऱ्या यवनाशी शांततेने व सभ्यपणाने वागणे आपल्या पितरांच्या श्राद्धाचे वेळी महारांस जेऊ घालणे; गंगेचे पाणी घरी आणीत असतां तहानेने तळमळत असलेल्या एका गाढवास तें पाजणे; वेश्या, चोर, जार, यांचा उद्धार करणे; एका अस्पृश्य मुलाला उचलून कडेवर घेणे, ज्ञानाचा अभिमान चढलेल्या आपल्या . मुलाशी म्हणजे हरिपंडिताशी शांतरीतीने वागणे, या व इतर अशा अनेक गोष्टींनी एकनाथ हे शांतता, दया, अक्रोध, समता वगैरे गुणांचे मूर्तिमंत अवतार होते ‘असें म्हणण्यास हरकत नाही. एकदा त्यांच्या गळ्यास रोग झाला असतां "ज्ञानदेवांच्या गळ्यास लागलेल्या अजानवृक्षाची मुळी तूं काढ, म्हणजे तुझा रोग बरा